ओझरच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'उमेश'ची जिद्द अन् मेहनत आली फळाला; पंचक्रोशीत होतेय कौतुक

उत्तम गोसावी
Wednesday, 20 January 2021

शिक्षण घेत असतानाच उमेश व त्याचे मित्र डॉ. रोहन बारसे यांनी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत कोकरे, फार्मसी डिपार्टमेंट प्रमुख डॉ. अमोल तगलपल्लेवार यांच्या मदतीने महिनाभर पुणे येथील जवळपास ५० नेत्ररोगतज्ज्ञांच्या भेटी घेत डोळ्याला होणाऱ्या ग्लुकोमा आजारावर डोळ्यात टाकल्या जाणाऱ्या औषधांबाबत माहिती संकलित केली.

ओझर (नाशिक) : ओझरच्या उमेश लढ्ढा या युवकाने डोळ्यांच्या आजारावरील औषधाचे संशोधन करून त्याचे पेटंट मिळविले आहे. उमेशच्या यशाने ओझरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. उमेश सध्या आडगावच्या भुजबळ नॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट फार्मसीत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. उमेशने फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत असतानाच २०१४ मध्ये पेटंट रजिस्टर करून आपल्या नावावर १३ जानेवारी २०२१ ला एक पेटंट नोंद केले आहे. 

‘ग्लुकोमा’ औषधाच्या पेटंटचा उमेश ठरला मानकरी 

ओझर गावातील हे पहिलेच पेटंट असल्याचे उमेशने माहिती दिली आहे. उमेशने सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज, नऱ्हे कॅम्पस येथून शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेत असतानाच उमेश व त्याचे मित्र डॉ. रोहन बारसे यांनी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत कोकरे, फार्मसी डिपार्टमेंट प्रमुख डॉ. अमोल तगलपल्लेवार यांच्या मदतीने महिनाभर पुणे येथील जवळपास ५० नेत्ररोगतज्ज्ञांच्या भेटी घेत डोळ्याला होणाऱ्या ग्लुकोमा आजारावर डोळ्यात टाकल्या जाणाऱ्या औषधांबाबत माहिती संकलित केली. त्यानुसार महाविद्यालयातील प्रयोगशाळेत एका औषधाचा शोध घेण्यास सुरवात केली. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत कोकरे व फार्मसी विभागप्रमुख डॉ. अमोल तगलपल्लेवार, विद्यार्थी डॉ. रोहन बारसे, उमेश लढ्ढा यांना ग्लुकोमा आजारावरील उपयुक्त संशोधनाबद्दल भारत सरकारने पेटंट मंजूर केले आहे. या संशोधनामुळे ग्लुकोमावरील उपचार कमी मात्रेने औषध वापरूनसुद्धा प्रभावीपणे करता येणार आहे. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

पेटंटप्राप्त संशोधन हे ग्लुकोमासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कमी औषध वापरूनसुद्धा प्रभावीपणे ग्लुकोमाचे उपचार करणे शक्य होणार आहे. हे संशोधन बाजारात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - प्रा. उमेश लढ्ढा, ओझर  

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ozars Umesh received a patent for a glaucoma drug nashik marathi news