esakal | निसर्गाच्या सानिध्यातील जगावेगळी पैठणी! अनोख्या चित्राने महावस्र जपणार नाविन्यता 
sakal

बोलून बातमी शोधा

paithni nature 123.jpg

पैठणीवरील नाजुकशी बुट्टी, पदरावरचा नाचणारा मोर, नजरेत भरणारी बुट्टी, कमळाची फुले बांगडी मोर अन आकर्षक रंगसंगती... ही विणकामाची खासियत या वस्त्राला शतकानुशतके मौल्यवान ठरवत आहे. पैठणीवरील या नक्षीला आता नवा आयाम मिळत असून पैठणीची डिझाईन ग्लोबल होऊ लागली आहे.

निसर्गाच्या सानिध्यातील जगावेगळी पैठणी! अनोख्या चित्राने महावस्र जपणार नाविन्यता 

sakal_logo
By
संतोष विंचू

नाशिक / येवला : पैठणीवरील नाजुकशी बुट्टी, पदरावरचा नाचणारा मोर, नजरेत भरणारी बुट्टी, कमळाची फुले बांगडी मोर अन आकर्षक रंगसंगती... ही विणकामाची खासियत या वस्त्राला शतकानुशतके मौल्यवान ठरवत आहे. पैठणीवरील या नक्षीला आता नवा आयाम मिळत असून पैठणीची डिझाईन ग्लोबल होऊ लागली आहे.

निसर्गाच्या सानिध्यातील जगावेगळी पैठणी 

आता येवल्यातील कारागिरांनी काळाप्रमाणे बदलत आपल्या व्यवसायात नाविन्यपूर्णता जपत पैठणीवर वारली चित्रशैली साकारली..कोणी नरेंद्र मोदी तर कोणी बाळासाहेब ठाकरे, साईबाबा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रतिकृती देखील पैठणीवर विणल्या. मात्र सर्वात महागड्या ओळखल्या जाणाऱ्या ब्रॉकेट प्रकारातील जगावेगळी निसर्ग चित्रातील पैठणी येथे साकारत असून तिचे अर्धेअधिक कामही पूर्ण झाले आहे.या पैठणीवर निरनिराळे कलाकुसर साकारून तिचे रूप आणखी खुलवण्याचा प्रयत्न केला आहे तो नागडे (ता. येवला) येथील पैठणी कारागीर रमेश परदेशी यांनी...

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा


पारंपारितेत जपली आधुनिकता, हरणासह जिराफाच्या चित्राने महावस्र जपणार नाविन्यता 

या पैठणीवर त्यांनी निसर्ग सौंदर्यासह वन्यप्राण्यांचे चित्र साकारले आहे.रमेश परदेशी यांनी हरीण,जिराफ माकड व निसर्गाच्या सहवासातील ब्रॉकेट प्रकारात बनवलेली पैठणी आगळीवेगळी ठरली असून तब्बल चार लाख रुपये किंमतीची आहे. तसे हे काम करण्यासाठी त्यांना मेहनत पण तितकीच घ्यावी लागली. रोज एक ते दिड इंच काम करून दोन कारागीर सहा महिन्याच्या कालावधीत हि वेगळी पैठणी पूर्ण कारणार आहे. साडीची किंमत हि ४ लाख १५ हजार इतकी आहे. सर्व सामान्यांना परवडणारी हि किंमत नसली तरी पैठणीच्या अस्सल शौकिनांच्या नक्कीच मनात उतरणारी हि कलाकुसर असून भविष्यात हि डिजाईन देखील पसंतीस उतरणार हे नक्की..! 

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

“आमच्याकडे अनेक ग्राहक येतात,त्यांच्या कडून नेहमीच पैठणीत वेगळेपण काय हा प्रश्न विचारला जायचा. राष्ट्रीय परितोषिक मिळालेला विणकाम म्हणून ही गोष्ट मला नेहमीच खुणवत होती आणि त्यातूनच काहीतरी वेगळे करण्याच्या संकल्पनेतूनही नैसर्गिक पैठणी तयार करण्यासाठी मी हाती घेतली आहे. दोन कारागीर यावर काम करत असून तब्बल सहा महिने तिला विणकामासाठी लागणार आहे. चार ते साडेचार लाख रुपये किमतीने विक्री होईल असा कयास आहे. - रमेश परदेशी, राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त पैठणी विणकर