तत्काळ करा 'त्यांच्या' बदल्या!.. का करताय आमच्या आरोग्याची हेळसांड?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

(अंबासन) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

नाशिक : (अंबासन) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मन मानी कारभारामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला तालुका आरोग्य विभागाने चक्क 11 नोटिसा बजावल्याचे समोर आले आहे. 

वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास

वैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्काळ बदलीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीनेही पत्रव्यवहार केला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. मंगळवारी (ता. 11) आठवडे बाजार असल्याने रुग्णांची गर्दी होती. मात्र, सकाळी अकरानंतर ही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत रुग्णांनी ग्रामपंचायतीचे सदस्य जिभाऊ कोर यांना माहिती देताच ते प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. श्री. कोर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत आहिरराव, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सभापती इंदूबाई ढुमसे व उपसभापती कान्हू आहिरे यांना भ्रमणध्वनीवरून याबाबत माहिती दिली. सकाळी साडे अकराच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी दुचाकीने आरोग्य केंद्रात हजर झाले. 

हेही वाचा > तुमचे डेबिट, क्रेडिट कार्ड नक्की सुरक्षित आहेत ना?...कारण...

49 हजार लोकसंख्येचा भार

तालुक्‍यातील आरोग्य विभागाने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास 11 नोटिसा बजावल्या असून, नोटिसा वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज मंडावत यांच्याशी संपर्क साधला असता, कर्मचारी संख्या कमी असतांनाही आपण आपल्या परीने काम करीत असल्याचे सांगितले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील 49 हजार लोकसंख्येचा भार आहे. 

अंबासन प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा 

उपकेंद्र  :  7 
लॅब टेक्‍निशियन  :  1 
आरोग्यसेवक  :  4 
आरोग्यसेविका  :  5 
आरोग्य सहाय्यिका :  1  

आम्ही तीन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात चकरा मारत आहोत. वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने खासगी रुग्णालयात जावे लागते. मोठे आरोग्य केंद्र असूनही रुग्णांची हेळसांड होते. -सुमनबाई सोनवणे, अंबासन 

हेही वाचा > तुमचे डेबिट, क्रेडिट कार्ड नक्की सुरक्षित आहेत ना?...कारण...

संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. -हेमंत आहिरराव, तालुका वैद्यकीय अधिकारी, बागलाण 

हेही वाचा > 'आई नको न रडू!'...असं म्हणत 'तो' ही रडू लागला...अन् तेवढ्यात 

वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यास वेळोवेळी सूचना देऊनही मुख्यालयात राहत नसेल, तर तातडीने बदली करण्यात यावी. -कान्हू आहिरे, उपसभापती, पंचायत समिती, बागलाण 

हेही वाचा > लज्जास्पद : पैशासाठी स्वत:च्याच बायकोचं दुसरं लग्न लावत होता 'तो'...अन्


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patient's ignoring at Ambasan Health Center nashik marathi news