लज्जास्पद : पैशासाठी स्वत:च्याच बायकोचं दुसरं लग्न लावत होता 'तो'...अन्

female abused.jpg
female abused.jpg

नाशिक : (मालेगाव) पैशाच्या हव्यासापोटी स्वत:च्याच पत्नीचा जबरदस्ती फारकत घेऊन दुसरा विवाह लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात 
आला आहे. सदर विवाहित पुरुषाला या कृत्यात मदत करणाऱ्या महिलेविरुध्द देखील रमजानपुरा पोलिसात पीडीत महिलेने तक्रार दिली आहे.

असा आहे प्रकार

परभणीतील एका मुलीचा विवाह ३१ जानेवारीस संशयित शेख इमरान शेख आबीद (रा. सलमान फारसी मशीदजवळ, रमजानपुरा) याच्यांशी झाला असून, परभणीतून मनमाड ला पोहोचताच संशयित इमरानने पीडित महिलेस मध्यस्थ असलेल्या शबाना नुरअली शाह (रा. सलीमनगर) हिच्याकडे सोडून निघून गेला. संशयित महिला शबानाने पीडितेस तिच्या घरी आणले. इमरानचे लग्न झाले असून, त्यास दोन अपत्ये आहेत. दोन दिवसानंतर इमरान आला. शबाना व इमरान याने पीडितेस रिक्षाने एका कार्यालयात नेले. तेथे फारकतीच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर पुन्हा घरी न आणता म्हाळदे शिवारात नेले. तिच्या गळ्यातील १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पान, पाच हजारांचे पायातील चांदीचे पैंजण काढून घेत तिला दोन दिवस कोंडून ठेवले. नंतर इमरान व शबाना यांनी पीडितेचे दुसरे लग्न लावण्या साठी बळजबरीने हळद-मेहंदी लावली. शुक्रवारी पीडित महिलेचे वडील आले असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

दोघांविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

पीडितेच्या वडिलांनी नश्र फाउण्डेशनच्या पदाधिकाऱ्यांसमोर झालेला प्रकार कथन केला. पीडित महिलेसह त्यांनी रमजानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शेख इमरान शेख आबीद व मध्यस्थी महिला शबाना नुरअली शाह या दोघांविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात करीत आहेत. 

प्रकरणे परस्पर मिटविली जातात...

समाजाची बदनामी होऊ नये म्हणून आपसात बसून अर्थपूर्ण समेट घडवून प्रकरणे परस्पर मिटविली जातात. याबाबत पोलिसांत तक्रारही देण्यात येत नाही. त्यामुळे मध्यस्थांचे फावून अनेक गोरगरीब कुटुंबांची फसवणूक केली जात आहे.- डॉ. इब्राहीम सय्यद, पदाधिकारी, नश्र फाउण्डेशन 

न्याय मिळावा

सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात यश न आल्याने आम्हास आर्थिक आमिष दाखविण्यात आले. माझे आई-वडील गरीब असून, मोलमजुरी करतात. भविष्यात कुठल्याही तरुणीवर असा प्रसंग ओढवू नये म्हणून संशयितांवर कठोर कारवाई करून आम्हांस न्याय देण्यात यावा.- पीडित महिला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com