मालेगाव तालुक्यात ९६ ग्रामपंचायतींच्या ९४६ जागांसाठी मतदान; सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला

प्रमोद सावंत
Friday, 15 January 2021

तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या ३४० प्रभागांमधून ९४६ जागांसाठी मतदान झाले. गावपातळीवरील प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कृषिमंत्री दादा भुसे व युवा नेते अद्वय हिरे यांच्या समर्थकांमध्येच बहुतांशी ठिकाणी लढत होत आहेत.

मालेगाव (जि.नाशिक) : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) उत्साहात मतदान झाले. अनेक ठिकाणी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदारांना ने-आण करण्यासाठी रिक्षा व चारचाकींचा सर्रास वापर झाला. सकाळी साडेसात ते साडेनऊ या दोन तासांत ९.६७ टक्के, सकाळी साडेअकरापर्यंत २८.८५ टक्के, दुपारी दीडपर्यंत ४८.८२, तर दुपारी साडेतीनपर्यंत ६६.६८ टक्के मतदान झाले. संथगतीने मतदान होत असल्याने दुपारी चारनंतर मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. निवडणुकीतील एक हजार ६८४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. 

दादा भुसे व अद्वय हिरे यांच्या समर्थकांमध्येच लढती

तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या ३४० प्रभागांमधून ९४६ जागांसाठी मतदान झाले. गावपातळीवरील प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कृषिमंत्री दादा भुसे व युवा नेते अद्वय हिरे यांच्या समर्थकांमध्येच बहुतांशी ठिकाणी लढत होत आहेत. थंडीमुळे सकाळी मतदानाला कमी प्रतिसाद होता. दोन तासांत जेमतेम साडेनऊ टक्के मतदान झाले. नऊनंतर मतदानासाठी अनेक गावांमध्ये रांगा लागल्या. यानंतर टक्केवारी वाढतच गेली. दुपारी साडेतीनपर्यंत ६६ टक्के मतदान झाले. मतदारांची नावे शोधण्यासाठी उमेदवारांनी संगणक, लॅपटॉपची व्यवस्था, ग्रामीण भागातील हॉटेल, उपहारगृह दिवसभर हाऊसफुल होती. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

- मतदानादरम्यान किरकोळ कुरबुरी 
- बोधेतील आदर्श मतदान केंद्रावर प्रथमच मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत 
- येसगाव व काही ठिकाणी मतदान यंत्र पडले बंद 
- नवीन मतदारांचा मतदानासाठी उत्साह 
- सायंकाळी पाचपर्यंत आर्थिक उलाढाली 
- शेतमजुरांसह कष्टकऱ्यांनी घेतली हक्काची सुटी 
- गावच्या कारभारासाठी प्रमुख नेत्यांचा गावात ठिय्या 
- यंत्रामुळे काही मतदान चिन्ह पुसटशे दिसत असल्याची उमेदवारांची तक्रार 

ग्रामपंचायतनिहाय दुपारी साडेतीनपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी
राजमाने- ४१.२८, घाणेगाव- ७७.३६, चंदनपुरी- ६०.०७, येसगाव बुद्रुक- ६५.१६, डोंगराळे- ६९.३०, लेंडाणे- ८१.७७, दसाणे- ७३.९१, अजंग- ५९.३३, वऱ्हाणे- ६२.२५, वनपट- ८२.३८, सोनज- ६८.८७, कौळाणे नि.- ६७.७१, पिंपळगाव- ४९.२६, चिंचावड- ८१.२२, गुगुळवाड- ६२.०८, गारेगाव- ७४.७३, झाडी- ७८.८८, खायदे- ७१.८२, खाकुर्डी- ६९.४१, नांदगाव- ६९.४८, टाकळी- ७०.२३, कोठरे बुद्रुक- ६५.३२, कळवाडी- ५०.५९, वडेल- ५८.४७, कुकाणे- ६९.४०, नरडाणे- ८२.४१, उंबरदे- ६५.७२, पांढरुण- ८८.५९, मथुरपाडे- ६७.९०, रावळगाव- ४६.२८, शेरुळ- ६५.४४, येसगाव खुर्द- ८३.२२, एरंडगाव- ७०.८७, डाबली- ६७.७३, लोणवाडे- ७७.९९, चिखलओहोळ- ६६.२९, विराणे- ७८.३९, भिलकोट- ६५.५७, निमगाव खुर्द- ८८.९५, गिलाणे- ७५.३२, दहिदी- ७०.९४, ढवळेश्‍वर- ६५.९६, अजंदे- ८९.४०, अस्ताणे- ६६.५६, आघार खुर्द- ८०.८३, जेऊर- ८७.४०, जळकू- ७९.७९, जळगाव नि.- ७०.८६, वडगाव- ५९.४१, वळवाडे-५८.६५, वळवाडी- ७९.०१, हाताणे- ६४.७९, सायने खुर्द- ८१.५६, टिंगरी- ८५.८८, टेहेरे- ५०.९०, मेहुणे- ७५.५९, पाडळदे- ५६.०८, मुंगसे- ६९.५८, माणके- ७५.७९, मळगाव- ७५.९८, रौंझाणे- ७९.९५, शेंदुर्णी- ७९.९८, घोडेगाव- ८६.७०, हिसवाळ- ४६.०५, निमगुले- ७२.१०, निमगाव- ६५.३५, देवघट- ७३.३९, देवारपाडे- ६६.२४, दहिवाळ- ७३.७५, आघार बुद्रुक- ६६.६५, वाके- ६६.०६, सवंदगाव- ७०.९०, चिंचवे गा.- ३६.६६, खडकी- ७०.३१, खलाणे- ७८.८८, गिगाव- ७६.१६, कजवाडे- ६९.५५, तळवाडे- ५५.०९, जळगाव गा.-६६.३६, झोडगे- ५६.०९, सिताणे- ८२.१३, निमशेवडी- ५६.३२, दापुरे- ७२.६८, भारदेनगर- ६१.२३, सावकारवाडी- ७८.९९, साकूर- ७५.२९, साकुरी नि.- ७९.२४, गरबड- ६९.१५, चिंचगव्हाण- ७७.५२, नाळे- ७७.९६, कंधाणे- ८२.८७, कौळाणे गा. - ६९.१६, साजवहाळ- ७६.६२, नागझरी- ५८.०३, गाळणे- ६६.०२, पाथर्डे- ८७.६२.  

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: peaceful voting took place for Gram Panchayat elections In Malegaon taluka nashik marathi news