दहशतच! महामारी ब्रॅन्डचा थवा पोहचला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी.. नागरिक धास्तावले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

जगभर हाहाकार उडविणाऱ्या कोरोनाच्या चर्चेमुळे महामारीचा ब्रॅन्ड असल्याचे कळाल्यापासून त्यांच्याकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्र्यंबकेश्‍वरला कुशावर्तावरील पिंपळाच्या झाडांवरील लटकणाऱ्या त्या थव्यांना पाहून नागरिकांना नकोसे वाटू लागले आहेत

नाशिक/ त्र्यंबकेश्‍वर : जगभर हाहाकार उडविणाऱ्या कोरोनाच्या चर्चेमुळे महामारीचे ब्रॅन्ड वटवाघूळ असल्याचे कळाल्यापासून वटवाघळांकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्र्यंबकेश्‍वरला कुशावर्तावरील पिंपळाच्या झाडांवरील लटकणाऱ्या वटवाघळांचे थवे त्र्यंबकेश्‍वरच्या नागरिकांना नकोसे वाटू लागले आहेत. त्यातच त्र्यंबकेश्‍वरला एकाचवेळी कोरोनाचा शिरकाव आणि ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी झाडांवर वटवाघळांची संख्या वाढत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. 

वटवाघूळ कोरोना महामारीचे ब्रॅन्ड

त्र्यंबकेश्‍वरला कुशावर्तालगतच्या मोठ्या जुन्या पिंपळांवर वटवाघळांचे कायमच वास्तव्य असायचे, यंदा हॉलिडे रिसॉर्ट ब्रह्मगिरी पायथ्यालगतच्या उंच जांभळांच्या झाडावर वटवाघळे मोठ्या संख्येने आहेत. ही वटवाघळे पावसापूर्वी मुक्कामाच्या जागेवर पेर धरून फिरतात व झाडावर उलटी लोंबकळलेली असतात. वटवाघळांचा नेहमीचा वावर येथील नागरिकांना नवा नाही. मात्र, वटवाघूळ कोरोना ब्रॅन्ड असल्याचे पुढे येऊ लागले. चीनला वटवाघळाने कोरोना दिल्याच्या बातम्यांवरून आता गावातील वटवाघळेही 
नागरिकांना भीतिदायक वाटू लागले आहेत. एरवी रोज दिसणाऱ्या वटवाघळांबाबत कुणालाही कुतुहल नव्हते. मात्र, वटवाघूळ कोरोना महामारीचे ब्रॅन्ड असल्याचे कळले. तेव्हापासून लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. 

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..​

त्र्यंबकवासीय धास्तावले 
त्र्यंबकेश्‍वरला कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तीन महिने खबरदारी घेऊनही रुग्ण आढळल्याने शहरात निर्जंतुकीकरण सुरू आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांसाठीही त्र्यंबकेश्‍वर देवस्थानतर्फे विश्‍वस्त प्रशांत गायधनी यांच्या हस्ते मास्क, हात मोजे व सॅनिटायजर ड्रम मुख्याधिकारी प्रवीण निकम यांच्याकडे देण्यात आले आहे. याशिवाय उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पीपीई कीट व गरजूंना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 लाखांची मदत अशा उपक्रमांतून कोरोनाविरोधात लढाई सुरू आहे. गावात ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी जांभळांच्या झाडावर वटवाघळांची संख्या वाढल्याने त्र्यंबकेश्‍वरवासीय चांगलेच धास्तावले आहेत.

हेही वाचा > डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The people of Trimbak were terrified by the herds of tigers