नदीवरील पडक्या खोलीत तो 'तिच्यावर' बळजबरीने...सत्य समजल्यावर धक्काच!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 January 2020

एक वर्षापासून तिला बळजबरी व धमकी देऊन वेळोवेळी बाणगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या मंदिराजवळील पडक्या खोलीत नेऊन लैंगिक संबंध ठेवले. "याची कुठेही वाच्यता केली तर बघ" असे सांगून यासाठी तिच्या भावानांही जीवे मारण्याची धमकी व दमबाजी केली

नाशिक : कसबे सुकेणे येथील रहिवासी असलेल्या परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून ठार करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. संशयितास पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जेव्हा तिच्या पोटात अचानक दुखू लागले....
एक वर्षापासून तिला बळजबरी व धमकी देऊन वेळोवेळी बाणगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या मंदिराजवळील पडक्या खोलीत नेऊन लैंगिक संबंध ठेवले. "याची कुठेही वाच्यता केली तर बघ" असे सांगून यासाठी तिच्या भावानांही जीवे मारण्याची धमकी व दमबाजी केली. दरम्यान जेव्हा तिच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिच्या आईने तिला सिव्हील हॉस्पिटलला अॅडमिट केले. त्या वेळेस एक वर्षाच्या लैंगिक अत्याचारातून पिडीत मुलीस चार महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. तत्क्षणी आईने ओझर पोलीसात तक्रार दिली..त्यानंतर उपविभागिय अधिकारी अरूंधती राणे, ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भगवान मथुरे, सपोनि अजय कवडे बाळासाहेब पानसरे, भास्करराव पवार, बंडू हेगडे, ताराचंद चौरे, बापू आहेर, ईश्वर धारफळे यांनी फिर्यादिच्या माहितीनुसार सापळा रचून आरोपी सनीदादा उर्फ सनी दिलीप जाधव (वय 30, रा. कुंभार गल्ली कसबे सुकेणे) यास अटक केली. तसेच त्यास निफाड कोर्टात हजर केले असता पुढील तपासासाठी पांच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे 

हेही वाचा > धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..

वर्षभरापासून लैंगिक अत्याचार

संशयित सनीने अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार केला. तसेच तिने व तिच्या भावाने वाच्यता करू नये, यासाठी ठार करण्याची धमकी दिली. दरम्यान, मंगळवारी (ता. 7) तिच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिच्या आईने तिला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्या वेळेस एक वर्षाच्या लैंगिक अत्याचारातून पीडित चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पीडितेच्या आईने ओझर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून संशयित सनी जाधव याला अटक करण्यात आली. निफाड न्यायालयात त्यास बुधवारी हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

हेही वाचा > PHOTOS : सहनशीलतेची हद्द पार..ज्येष्ठ रुग्णाचा पाहिला अंत.. रुग्णालय सामान्यांसाठी की धनदांडग्यांसाठी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: physical abuse with minor girl Nashik Crime marathi News