जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

त्र्यंबकेश्‍वर येथील पाटील गल्लीत लॉज आहे. मंगळवारी या ठिकाणी दोन अल्पवयीन मुले-मुली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्र्यंबक पोलिसांनी तेथे छापा टाकला. संबंधित मुला-मुलींनी शालेय गणवेश घातलेला असल्याचे पाहून पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा..

नाशिक : लॉज, हॉटेलमधून ऐरवी युवक-युवतींना ताब्यात घेतल्याच्या बातम्या ऐकीवात असताना आता चक्क गणवेशधारी शाळकरी पोरं-पोरीही लॉजची पायरी चढत असल्याचा प्रकार त्र्यंबक येथे उघडकीस आला आहे. त्यामुळे नव्या पिढीत नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्र्यंबक येथील पाटील गल्लीतील एका लॉजमध्ये मंगळवारी (ता. 25) दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलिसही काही काळ चक्रावून गेले होते. शेवटी संबंधित मुला-मुलींच्या पालकांना त्र्यंबक पोलिस ठाण्यात बोलावून समज देत सोडून देण्यात आले. या घटनेमुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे

असा घडला धक्कादायक प्रकार...

त्र्यंबकेश्‍वर येथील पाटील गल्लीत लॉज आहे. मंगळवारी या ठिकाणी दोन अल्पवयीन मुले-मुली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्र्यंबक पोलिसांनी तेथे छापा टाकला. संबंधित मुला-मुलींनी शालेय गणवेश घातलेला असल्याचे पाहून पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली. उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांना अधिक चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. त्यानंतर संबंधितांच्या पालकांनाही बोलावून घेण्यात आले. मुला-मुलींचे कारनामे पाहून संबंधितांच्या पालकांना पोलिस ठाण्यातच रडू कोसळले. अल्पवयीन असल्याने त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.

हेही वाचा > हृदयद्रावक! रक्ताच्या थारोळ्यात असूनही "माऊलीची" बाळाची घट्ट मिठी सुटली नव्हती...अखेर..

लॉजमालकावर कारवाई करा...

त्र्यंबकेश्‍वरमधील पाटील गल्ली येथील लॉजमधून मंगळवारी (ता. 25) दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुला-मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्र्यंबक पोलिस ठाण्यात संबंधित मुले-मुली तसेच त्यांच्या पालकांना बोलावून समज देऊन सोडून देण्यात आले. अल्पवयीनांना अशा प्रकारे लॉज उपलब्ध करून देणाऱ्या लॉजमालकावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! खेळणाऱ्या चिमुकलीचा आवाज अचानक शांत झाला..आईने पाहिले तेव्हा तिचे पाय टबमध्ये होते...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police caught minor school students in the lodge Nashik Crime Marathi News