esakal | अजबच! सुरक्षारक्षकांकडून बालकांना पोलीओ डोस; पालकांचा संताप, VIDEO व्हायरल 

बोलून बातमी शोधा

cidco suraksha rakshak.jpg}

एकीकडे केंद्र व राज्य सरकार शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून काळजी घेते, तर दुसरीकडे महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याकडे केवळ एक ‘इव्हेंट’ म्हणून बघत असल्याचे दिसून आले.

अजबच! सुरक्षारक्षकांकडून बालकांना पोलीओ डोस; पालकांचा संताप, VIDEO व्हायरल 
sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (जि.नाशिक) : एकीकडे केंद्र व राज्य सरकार शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून काळजी घेते, तर दुसरीकडे महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याकडे केवळ एक ‘इव्हेंट’ म्हणून बघत असल्याचे दिसून आले. यामुळे बालकांच्या पालकांनी कमालीचा संताप व्यक्त केला. 

सिडकोच्या त्रिमूर्ती चौकातील केंद्रावरील प्रकार 
रविवारी (ता. ३१) नाशिक शहरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. पालकांनी पाच वर्षांच्या बालकांना जवळच्या केंद्रात नेत पल्स पोलिओचा डोस पाजले. मात्र, त्रिमूर्ती चौकातील पेठे शाळेतील केंद्रावर भलताच प्रकार बघायला मिळाला. दुपारी केंद्रातील आरोग्य कर्मचारी जेवणासाठी निघून गेले. केंद्रावर केवळ सुरक्षारक्षक उपस्थित होता. मग काय अखेर या सुरक्षारक्षकानेच आरोग्यसेवकाची भूमिका बजावत बालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदी करत स्वतःच्याच हाताने पल्स पोलिओचा डोस दिला. पालकांनी बालकांना डोस घेत निमूटपणे निघून जाणे पसंद केले. यावर काही पालकांनी मात्र जाब विचारण्याचा प्रयत्न केला. आरोग्य कर्मचारी जेवायला बसले आहेत, असे सांगून सुरक्षारक्षकांनीही आपले हात वर केले. यासंदर्भात चर्चा मात्र दुपारनंतर सिडको परिसरात चांगलीच चर्चिली गेली. आता यावर महापालिका वैद्यकीय विभाग काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

यासंदर्भात चौकशी करू. तथ्य आढळल्यास संबंधितांना नक्कीच नोटीस पाठवून कारवाई करण्यात येईल. -बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल


पल्स पोलिओ डोस देण्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी व इतरांची नेमणूक केलेली असते. त्यामुळे सुरक्षारक्षकाने पल्स देणे हा गंभीर प्रकार आहे. यासंदर्भात संबंधितावर कारवाई करण्यात येईल. हा प्रकार चुकीचा आहे. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. -नवीन बाजी, वैद्यकीय अधीक्षक, स्वामी समर्थ रुग्णालय, महापालिका, सिडको