esakal | मालेगावच्या अर्थकारणाला हातगाड्यांचे बळ...!
sakal

बोलून बातमी शोधा

hatgadi.jpg

येथे हातगाडी 25 रुपये रोजाने भाड्याने मिळते. सलग महिनाभर घेतल्यास 600 रुपये भाडे पडते. हातगाडी भाड्याने देण्याचा येथे अनेकांचा व्यवसाय आहे. साधी हातगाडी पाच ते साडेपाच हजाराला, तर टफ लावलेली आठ ते दहा हजाराला मिळते. हातगाडी तयार करणारे दोन प्रमुख ठेला मार्ट आहेत

मालेगावच्या अर्थकारणाला हातगाड्यांचे बळ...!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) हे शहर मुळातच गरीब, कष्टकऱ्यांचे व दारिद्य्र रेषेखालील मोठ्या लोकसंख्येचे असल्याने येथील खरेदी-विक्रीचे मुख्य केंद्र हातगाडी आहे. भाजीपाला, फळे, कपडे, चप्पल, बूट, मांस, सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ येथे हातगाडीवर सहज मिळतात. शहरातील खरेदी-विक्रीची निम्मी उलाढाल हातगाडीवर होते. दाटावाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये तर खरेदीचे मुख्य स्रोत हाच आहे. 

दहा हजारांवर हातगाड्या, विविध खरेदीचे स्रोत 

शहरात 80 टक्के भाजीपाला, फळे विक्री हातगाडीवर होते. येथील प्रमुख असलेल्या किदवाई रस्त्यावर दोनशे हातगाड्या असतात. या हातगाड्यांवर कपड्यांपासून तर विविध चैनीच्या वस्तू देखील मिळतात. सरदार चौक, सटाणा नाका, मोसम चौक, रामसेतू, मच्छी बाजार, कुसुंबा रोड, सोमवार बाजार, आयेशनगर, आझदनगर, कॅम्प रोड, चंदनपुरी गेट आदी भागात मोठ्या प्रमाणावर हातगाड्या कार्यरत आहेत. शहरातील विविध भागात राहणारे नागरिकही बाजारपेठांमध्ये जाण्यास कचरत आहेत. परिणामी, अनेक जण नजीकच असलेल्या किंवा अंगणात आलेल्या हातगाडीवरून वस्तू खरेदी करीत आहेत. 

हेही वाचा > डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार

25 रुपये रोजाने मिळते हातगाडी 

येथे हातगाडी 25 रुपये रोजाने भाड्याने मिळते. सलग महिनाभर घेतल्यास 600 रुपये भाडे पडते. हातगाडी भाड्याने देण्याचा येथे अनेकांचा व्यवसाय आहे. साधी हातगाडी पाच ते साडेपाच हजाराला, तर टफ लावलेली आठ ते दहा हजाराला मिळते. हातगाडी तयार करणारे दोन प्रमुख ठेला मार्ट आहेत.  

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..​