ऊस वाहतुकीसाठी शोधले नवे जुगाड! टायरगाडीला आता बैलांऐवजी ट्रॅक्टरची पॉवर 

शशिकांत पाटील
Tuesday, 6 October 2020

गत पाच वर्षापासून तोडणी व वाहतूक यंत्रणेत बदल होत आहे. टायर बैलगाडीला पर्याय म्हणून ट्रॅक्टरला दोन चाकी टायर गाडी सुधारणा करून त्यात बदल करून नवीन जुगाडचा वापर ऊस वाहतुकीसाठी  होऊ लागला आहे. 

न्यायडोंगरी (जि.नाशिक) : गत पाच वर्षापासून तोडणी व वाहतूक यंत्रणेत बदल होत आहे. टायर बैलगाडीला पर्याय म्हणून ट्रॅक्टरला दोन चाकी टायर गाडी सुधारणा करून त्यात बदल करून नवीन जुगाडचा वापर ऊस वाहतुकीसाठी होऊ लागला आहे. 

ऊसतोड यंत्रणेमध्ये उत्साहवर्धक वातावरण

सन२०२०-२१ गळीत हंगामासाठी राज्यात १०.६६ लाख हेक्टर क्षेत्रांमध्ये उसाची लागवड झाली. उसाचे संपूर्ण गाळप होण्यासाठी साधारणतः १८० दिवस साखर कारखाने सुरु ठेवण्याचा अंदाज आहे तसेच १८५ते १९५ साखर कारखाने सुरू होणे अपेक्षित आहे. या हंगामात चांगला पाऊस असल्यामुळे हेक्टरी उसाचे उत्पादनही वाढणार असल्याने ऊसतोड यंत्रणेमध्ये उत्साहवर्धक वातावरण आहे. त्यांच्या काही मागण्याबाबत सकारात्मक निर्णय होणे त्यांना अपेक्षित आहे.

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

बैलांऐवजी ट्रॅक्‍टरच्या वापर
साखर कारखाना कार्यक्षेत्रा नुसार ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उभी करावी लागते. त्यात टायर बैलगाडीने ऊस वाहतुकीचे सर्व कारखान्यात प्राधान्य असते. अलीकडील काळात बैलाच्या वाढत्या किमती व ऊस वाहून नेण्याची मर्यादा लक्षात घेता बैलांऐवजी ट्रॅक्‍टरच्या वापर करत जुगाड यांच्या सहाय्याने सहा माणसाच्या टोळीने दहा ते बारा टन ऊस तोडून वाहतूक करण्याचा वापर प्रभावीपणे वाढला आहे. या ट्रॅक्‍टरचा ड्रायव्हरसुद्धा ऊसतोड करू शकतो, याव्यतिरिक्त पाच माणसे असेल तरी यंत्रणा उभी राहू शकते. 

 

तीन वर्षापासून ट्रॅक्टर व जुगाड याच्या साह्याने ऊस वाहतूक करतो तीन वर्षात माझा अनुभव चांगला आहे. गतवर्षी ऊस कमी होता या वर्षी उसाचे क्षेत्र अधिक असल्याने यावर्षी ऊस वाहतुकीचा धंदा चांगला होणे अपेक्षित आहे. आम्हाला ऊसतोड वाहतुकी सह ५००ते५५०रू प्रतिटन दर मिळतो याव्यतिरिक्त मुकादमाचे १८ टक्के कमिशन मिळते व जुगाडास टायर व्यतिरिक्त फारसा दुरुस्ती खर्च येत नाही. काही कारखाने  हे मुकादम यांना भाड्याने देतात, तर बहुतांशी मुकादम ते स्वतःचे वापरतात.
 कार्यक्षेत्राच्या पाच ते दहा किमी अंतरावर ऊस वाहतूक करणेमोठ्या वाहनांना परवडत नाही, अथवा ते नापसंती दर्शवतात .त्यामानाने १ कि.मी पासून २० पर्यंत ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्‍टरच्या साह्याने ऊस वाहतूक करण्यास प्राधान्य मिळते. - जैरसिंग चव्हाण (इसापूर तांडा, ता. चाळीसगाव)

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

टायर बैलगाडीची कमी होणारी उपलब्धता यास्तव टायर जुगाडाचा वापर वाढतो आहे. हा कल सर्वत्र आहे व त्यास प्रतिसाद चांगला आहे- धनंजय लिंबोरे, मुख्य शेतकी अधिकारी, निरा भीमा सहकारी साखर कारखाना  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: power of a tractor instead of an ox nashik marathi news