esakal | विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! नाशिक जिल्ह्यात शाळा सुरू करण्याची तयारी 
sakal

बोलून बातमी शोधा

school students.jpg

नाशिकच्या ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रशासन अनुकूल आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबतही सकारात्‍मक असले तरी, पुढील आढावा बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल. तत्‍पूर्वी मुंबई, ठाणे आणि पुणे क्षेत्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात काय निर्णय घेतला जातो, याचे अवलोकन केले जाईल. 

विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! नाशिक जिल्ह्यात शाळा सुरू करण्याची तयारी 

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात उपचार घेत असलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या आटोक्‍यात येत असल्याने येत्‍या ४ जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची तयारी जिल्‍हा प्रशासनाने केली आहे. यापूर्वी झालेल्‍या निर्णयाप्रमाणे नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. जानेवारीच्‍या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यापासून कोरोना लसीकरणाची तयारी प्रशासनाने केली असून, साडेसहाशे बूथ निर्माण केले जाणार असल्‍याचेही त्‍यांनी या वेळी नमूद केले. 

शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रशासन अनुकूल
भुजबळ म्‍हणाले, की नाशिकच्या ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रशासन अनुकूल आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबतही सकारात्‍मक असले तरी, पुढील आढावा बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल. तत्‍पूर्वी मुंबई, ठाणे आणि पुणे क्षेत्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात काय निर्णय घेतला जातो, याचे अवलोकन केले जाईल. 

अन्‍य इयत्तांबाबत निर्णय नाही 
यापूर्वी राज्‍य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे नववी ते बारावीचे वर्ग ४ जानेवारीपासून सुरू केले जातील. अन्‍य इयत्तांबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. याबाबत केंद्र किंवा राज्‍य सरकार जे धोरण ठरवतील, त्‍याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल, असे श्री. भुजबळ यांनी स्‍पष्ट केले. तसेच शाळा सुरू होणार असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांची आरोग्‍य तपासणी, शालेय प्रांगणाची स्‍वच्‍छता, निर्जंतुकीकरण व अन्‍य उपाययोजना करण्यासंदर्भात शैक्षणिक संस्‍था, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना दिल्‍या असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

कोरोनाची लस ऐच्‍छिक 
कोरोनाच्‍या लसीकरणासंदर्भात प्रशासनाला जागृत राहण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी झाल्‍यानंतर व लस उपलब्‍ध होताच लसीकरण मोहीम हाती घेतली जाईल. साधारणतः जानेवारीच्‍या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मोहिमेला सुरवात होण्याचा अंदाज आहे. कोरोनाची लस ऐच्‍छिक असेल. परंतु, कोरोनाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्‍यांनी केले. मोहिमेसाठी जिल्‍हास्‍तरावर साडेसहाशे बूथ उभारणार असल्‍याचे त्यांनी स्‍पष्ट केले. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

पालकमंत्री भुजबळ : नववी ते बारावीच्‍या वर्गांचा समावेश 

जिल्‍हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता.१९) कोरोनाविषयक आढावा बैठकीनंतर झालेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्‍त कैलास जाधव, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस आयुक्‍त दीपक पांडे, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. रत्‍ना रावखंडे, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्यचिकित्‍सक डॉ. निखिल सैंदाणे, जिल्‍हा आरोग्‍याधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड आदी उपस्‍थित होते.