
लॉकडाऊनच्या काळात मध्यवर्ती कारागृहात नवीन कैद्यांना प्रवेश नसल्याने कारागृहजवळील के. एन. केला शाळेत निर्माण करण्यात आलेल्या कारागृहाच्या उपकेंद्र कोठडीतून दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान चोरीचा आरोपातला कैदी फरार झाल्याची गंभीर घटना घडली आहे.
नाशिक : (नाशिकरोड) बाथरूमला जातो म्हणून निमित्त करून तो फरार झाला. जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तो पळून गेला अशी चर्चा सध्या वर्तुळात रंगते आहे. लॉकडाऊनच्या काळात शाळेला बंदोबस्तही देण्यात आला तरीही तो फरार झाल्याची गंभीर घटना घडली आहे.
अशी आहे घटना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे नाशिकरोड येथील कारागृहात नवीन कैयद्यांना प्रवेश दिला जात नाही त्यामुळे नवीन भरती होणाऱ्या कच्चा कैद्यांची व्यवस्था जवळच असणाऱ्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या के. एन. केला या इंग्रजी शाळेत उपजेल तयार करून करण्यात आली आहे. या जेलमधून दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अजय राज वाघेला हा 379 या गुन्ह्यातील कैदी बाथरूमला जातो म्हणून निमित्त करून फरार झाला. यावेळी याठिकाणी सुरक्षा व्यवस्था दोन अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांच्या हातात होती मात्र जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा कैदी पळून गेला अशी चर्चा सध्या कारागृह वर्तुळात रंगते आहे.
हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणारी घटना..अखेर सुटलाच 'त्या' मजुरांचा धीर.. रोजच्या मरणातून सोडवला जीव एकदाचा
पोलिसांना चुकांडी देऊन फरार झालेल्या या कैद्याचा शोध सुरु असून जेलचे पोलीस हवालदार अब्दुल अजीज यांनी नाशिकरोड पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. पुढील प्रकरणाचा शोध नाशिकरोड पोलीस घेत आहेत.
हेही वाचा > राजेंद्र सरदार खून प्रकरण..अखेर गुढ उलघडले ! प्रियकराच्या मदतीने काढला कायमचा काटा