'या' तरुणाने केली मंदीवर मात...रोजगारनिर्मितीसाठी लढविली अशी शक्कल!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

चौंधाणे (ता. बागलाण) येथील पदवीधर तरुण किरण मोरे याने आयटीआय इलेक्‍ट्रिशियनचे शिक्षण घेऊन औद्योगिक क्षेत्रातील जागतिक मंदीच्या परिणामामुळे खासगी कंपनीतील आठ वर्षांपासूनची नोकरी सोडून गावात शुद्ध व थंड पाणीपुरवठा करणाऱ्या एटीएमचा स्वत:चा प्रकल्प सुरू करून परिसरातील तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे. 

नाशिक : चौंधाणे (ता. बागलाण) येथील पदवीधर तरुण किरण मोरे याने आयटीआय इलेक्‍ट्रिशियनचे शिक्षण घेऊन औद्योगिक क्षेत्रातील जागतिक मंदीच्या परिणामामुळे खासगी कंपनीतील आठ वर्षांपासूनची नोकरी सोडून गावात शुद्ध व थंड पाणीपुरवठा करणाऱ्या एटीएमचा स्वत:चा प्रकल्प सुरू करून परिसरातील तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे. 

एटीएमच्या माध्यमातून स्वस्त दरात शुद्ध व थंड पाण्याची सोय

आजकाल शहरी असो किंवा ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यक्रमात पिण्यासाठी शुद्ध व थंड पाण्याच्या जारची व्यवस्था केलेली असते. तसेच नोकरी, कामधंदा व व्यवसायानिमित्त घराबाहेर पडल्यावर किंवा प्रवासात आता सर्रासपणे पाण्याची बाटली विकत घेणारे दिसतात. त्यामुळे थंड बाटलीबंद पाणी व जारचा व्यवसाय तेजीत आहे. हीच संधी ओळखत अर्थशास्त्रात पदवी व इलेक्‍ट्रिशियनचे शिक्षण घेतलेल्या किरण मोरे याने बाजारपेठेतील तेजी-मंदी व परिसरातील जनतेची आणि काळाची गरज ओळखून या व्यवसायाची निवड करीत जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करून सटाणा ते डांगसौंदाणे रस्त्यालगत आधुनिक पद्धतीचे 24 बाय 7 पाणी एटीएमच्या माध्यमातून स्वस्त दरात शुद्ध व थंड पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्याला आठ लाख रुपये खर्च आला असून, गावातील व रस्त्याने जाणाऱ्या- येणाऱ्यांना फक्त एक रुपया लिटर या दराने बाटली किंवा भांड्यातून पाणी घेता येते. त्यासाठी ग्राहकांना पाणी एटीएम कार्ड व रिचार्जची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच कार्यक्रमांसाठी पाण्याचा जार घरपोच पुरविले जात आहेत. सध्या उन्हाची तीव्रता व लग्नसराईमुळे त्याच्या व्यवसायाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, स्वस्त दरात शुद्ध व थंड पाणी मिळत असल्याने परिसरात सर्वत्र त्याच्या प्रकल्पाची चर्चा होत आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! आंघोळीसाठी 'तीघी' तलावात उतरल्या...अन् थोड्या वेळाने मृतदेहच पडले बाहेर..

औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे खासगी कंपनीतील नोकरीची हमी नसल्याने व तुटपुंज्या पगारावर शहरात परवडत नव्हते. त्यामुळे नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला असून, शुद्ध व थंड पाण्याने तहान भागवताना ग्राहकांच्या समाधानातून मनस्वी आनंद मिळत आहे. - किरण मोरे, प्रकल्प संचालक, चौंधाणे  

हेही वाचा > नाशिककरांनो..! सायंकाळी पाचपर्यंतच पेट्रोलपंप राहणार सुरू असल्याने काळजी घ्या
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pure water project created by leaving the job nashik marathi news