नाशिककरांनो..! सायंकाळी पाचपर्यंतच पेट्रोलपंप राहणार सुरू असल्याने काळजी घ्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की विक्री सेवा जीवनावश्‍यक सूचीतील उत्पादन असल्याने प्रतिकूल परिस्थितीतही विक्री सेवा सुरू ठेवली आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने गर्दी टाळणे महत्त्वाचे असले तरी अद्याप पंपांवरील गर्दी व विक्री कमी झालेली नाही. सरकारने सूचना करूनही नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडून इंधन भरण्यासाठी गर्दी करतात. यामुळे कर्मचारी संसर्ग होण्याच्या भीतीने कामावर येण्यास इच्छुक नाहीत. काहींनी काम सोडून दिले असून, काही कामगार मुळगावी परतले आहेत. अशा परिस्थितीत पेट्रोलपंपावर होणाऱ्या गर्दीस सेवा पुरविताना कुशल कामगारांचा तुटवडा निर्माण होत आहे.  

नाशिक  : कोरोना व्हायरसचा संभाव्य धोका लक्षात घेता विविध अडचणींचा सामना करताना नाशिक जिल्ह्यातील पेट्रोलपंप सोमवार (ता.23)पासून सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत खुले राहणार आहेत. यासंदर्भात नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनने निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील 360 पेट्रोलपंप डिलर्स या असोसिएशनचे सभासद आहेत.

पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनचा निर्णय 

यासंदर्भात प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की विक्री सेवा जीवनावश्‍यक सूचीतील उत्पादन असल्याने प्रतिकूल परिस्थितीतही विक्री सेवा सुरू ठेवली आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने गर्दी टाळणे महत्त्वाचे असले तरी अद्याप पंपांवरील गर्दी व विक्री कमी झालेली नाही. सरकारने सूचना करूनही नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडून इंधन भरण्यासाठी गर्दी करतात. यामुळे कर्मचारी संसर्ग होण्याच्या भीतीने कामावर येण्यास इच्छुक नाहीत. काहींनी काम सोडून दिले असून, काही कामगार मुळगावी परतले आहेत. अशा परिस्थितीत पेट्रोलपंपावर होणाऱ्या गर्दीस सेवा पुरविताना कुशल कामगारांचा तुटवडा निर्माण होत आहे.  

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol pumps will continue till 5 pm in Nashik Marathi News