प्रलंबीत कोरोना अहवालांवर प्रश्‍नचिन्ह...अनेकांचे अहवाल हे मृत्यूपश्‍चातच!

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 27 June 2020

जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना, संशयित रुग्णही मोठ्या संख्येने उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे अहवाल प्रलंबीत राहण्याचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली असूनही अहवाल प्रलंबीत राहात असल्याने प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

नाशिक : जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना, संशयित रुग्णही मोठ्या संख्येने उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे अहवाल प्रलंबीत राहण्याचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली असूनही अहवाल प्रलंबीत राहात असल्याने प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

प्रश्‍नचिन्ह उपस्थित
शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात 624 संशयित रुग्ण दाखल झाले. यात सर्वाधिक 446 रुग्ण नाशिक शहरातील, तर मालेगावात नऊ आणि उर्वरित जिल्ह्यात 169 रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने, प्रलंबित स्वॅबचे प्रमाणही वाढत आहे. शुक्रवारी 712 अहवाल विविध प्रयोगशाळांकडे प्रलंबित होते. यामध्ये नाशिक शहरातील 229, मालेगाव शहरातील 350, तर उर्वरित जिल्ह्यातील 133 स्वॅबचा समावेश आहे. रुग्णांचे अहवाल तत्काळ मिळावेत यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली. तरीही अहवाल प्रलंबित राहात असल्याने प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..​

प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली तरीही

दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 26) कोरोनामुळे आणखी 14 रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. यात नाशिक शहरातील दहा जणांचा समावेश असला, तरी त्यापैकी नऊ रूग्णांचे अहवाल हे मृत्यूपश्‍चात आलेले आहेत. तसेच, मालेगावातील दोन व निफाड तालुक्‍यात विंचूर, पिंपळगाव बसवंत येथील प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या 213 वर पोचली आहे. दुसरीकडे दिवसभरात 115 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यात सर्वाधिक 91 बाधित नाशिक शहरातील आहेत. त्याचवेळी प्रलंबित अहवालांची संख्याही 715 झाली आहे. दिवसभरात 115 रुग्ण वाढले. यात नाशिक शहरातील 91, तसेच नाशिक तालुक्‍यात देवळाली कॅम्प, शिंदे-पळसे, विंचूरगवळी, ओझर, पिंपळगाव बसवंत, सिन्नर शहर, चांदवड, दिंडोरीमध्येही रुग्ण वाढले. नाशिक शहरातील रुग्ण हे पंचवटी, जुने नाशिक, द्वारका, नाशिक रोड, उपनगर, सिडको परिसरातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन हजार 493 झाली आहे.

हेही वाचा > डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question marks on pending Corona reports nashik marathi news