अटल आरोग्य वाहिनी योजनेमुळे कळवणमधील 'या' विद्यार्थिनीचा पुनर्जन्म!

chandrabgha.jpg
chandrabgha.jpg

नाशिक : (कळवण) येथील गोपाळखडी शासकीय आश्रमशाळेत नववी इयत्तेत शिकणा ऱ्या 15 वर्षीय चंद्रभागा मोहन चौरे या आदिवासी विद्यार्थिनीवर उपचार करत तिला जीवदान देण्यात आदिवासी विकास विभागाची अटल आरोग्य वाहिनी योजना यशस्वी ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून चंद्रभागाच्या हृदयाची गंभीर शस्त्रक्रिया गुरुवा री मुंबईच्या केईएम रुग्णालयात यशस्विरीत्या पूर्ण करण्यात आली. आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळेच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या शाळा व्यवस्थापन समि तीच्या निधीतून दोन लाख 85 हजार रुपये खर्च करत चंद्रभागावर ही शस्त्रक्रिया कर ण्यात आली आहे. 

आरोग्य चाचणीत चंद्रभागाला हृदयाचा आजार असल्याचे निष्पन्न

दीड वर्षांपूर्वी अटल आरोग्य वाहिनीमार्फत करण्यात आलेल्या आरोग्य चाचणीत चंद्र भागाला हृदयाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले होते. चंद्रभागेच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्तवाहिनी दबलेली अस ल्याचे आढळून आले. त्यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नव्हता. चंद्रभागेला श्‍वास घेण्यास खूप त्रास सहन करावा लागत होता. त्यावेळी अटल आरोग्य वाहिनीच्या माध्यमातून चंद्रभागाला जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार करण्यासाठी गंभीर शस्त्रक्रिया करण्याचे समजल्यावर चंद्रभागाचे पालक उपचारासाठी तयार नव्हते. मात्र, अटल आरोग्य वाहिनीच्या डॉक्‍टरांनी चंद्रभागा च्या पालकांचे समुपदेशन करत त्यांना चंद्रभागेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार केले, अशी माहिती अटल आरोग्य वाहिनीचे शाळा आरोग्य सहाय्यक व्यवस्थापक डॉ. किरण केदार यांनी दिली. 

चंद्रभागेच्या हृदयावर तब्बल तीन तास शस्त्रक्रिया

अटल आरोग्य वाहिनीच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार मुंबईतील केईएम रुग्णा लयात 26 डिसेंबरला चंद्रभागेची आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली. आजाराचे निदान झाल्यानंतर 7 फेब्रुवारीला चंद्रभागेला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 10 फेब्रुवारीला चंद्रभागेवर ऍन्जिओग्राफी करण्यात आली. मात्र, चंद्र भागेचे वय अवघे 15 वर्षे असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करणे जोखीमचे होते. मात्र, आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सुरू असणाऱ्या अटल आरोग्य वाहिनीमार्फत तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून चंद्रभागेच्या आजाराचे वेळीच निदान झाल्याने केईएम रुग्णालयातील डॉक्‍टरांना चंद्रभागेवरील उपचारपद्धती सुयोग्यरीतीने हाताळण्यास पुरेसा वेळ मिळाला. 20 फेब्रुवारीला दुपारी बाराला चंद्रभागेच्या हृदयावर तब्बल तीन तास शस्त्रक्रिया कर ण्यात आली. शस्त्रक्रियेत दबलेल्या रक्तवाहिनीत स्टेन टाकण्यात आली. शस्त्रक्रिये मुळे चंद्रभागेला आता श्‍वास घेण्यास कोणताही अडथळा येत नसून तिची प्रकृती स्थिर आहे. 

दीड वर्षांपासून मला श्‍वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे मला मित्र-मैत्रिणींसोबत खेळताही येत नव्हते. मात्र या शस्त्रक्रियेनंतर माझा श्‍वसनाचा त्रास दूर झाला असून, माझे पुढील आयुष्य सुरक्षित झाले आहे, असे चंद्रभागा चौरे हिने सांगितले. 

 
शिक्षकाची विद्यार्थिनीला रुग्णालयात सोबत 

गोपाळखडी शासकीय आश्रमशाळेत डिसेंबर महिन्यात गणित विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झालेले रोशन शेळके यांची चंद्रभागेला तिच्या उपचारादरम्यान मोठी साथ मिळा ली. आई-वडील अशिक्षित असल्यामुळे उपचारासाठी दुर्गम भागातून मुंबईत आणण्या ची पूर्ण जबाबदारी श्री. शेळके यांनी स्वीकारली. केईएम रुग्णालयात आपल्या विद्या र्थिनीसाठी ते 15 दिवस तिच्यासोबत होते. शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची उपलब्धता करून देणे, उपचाराच्या खर्चासाठी आवश्‍यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे यांसारख्या इतर सर्व कामांच्या जबाबदाऱ्या शिक्षक शेळके यांनी पार पाडल्या. 

आमच्या कुटुंबाची एकूण शेती फक्त दीड एकर असून, इतकी खर्चिक शस्त्रक्रिया आमच्या ऐपतीपलीकडची होती. शासनाच्या अटल आरोग्य योजनेमुळे आमच्या मुलीचे प्राण वाचले. चंद्रभागाला सोबत करण्यासाठी गेले 15 दिवस आम्ही तिच्यासोबत आहोत. - कलाबाई चौरे (चंद्रभागाची आई)  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com