देवळ्यात लाल कांद्याला 3 हजार शंभरचा भाव ; कांदा पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

योगेश सोनवणे
Monday, 28 September 2020

उन्हाळ कांद्यासोबत बाजार समित्यांना खरीप हंगामातील लाल कांद्याची प्रतीक्षा होती. ज्या शेतकऱ्यांचा उन्हाळ कांदा संपला अशा काही शेतकऱ्यांनी खरीप लाल कांद्यावर लक्ष केंद्रित केले असले तरी फारच कमी शेतकरी या कांदा उत्पादनात यशस्वी होत आहेत.

नाशिक/देवळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. २८) नवीन लाल कांदा विक्रीस आला. त्यास तीन हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. या हंगामातील पहिलाच लाल कांदा बाजारात आल्याने या कांद्याचे व शेतकऱ्याचे स्वागत करण्यात आले.

उन्हाळ कांद्यासोबत बाजार समित्यांना खरीप हंगामातील लाल कांद्याची प्रतीक्षा होती. ज्या शेतकऱ्यांचा उन्हाळ कांदा संपला अशा काही शेतकऱ्यांनी खरीप लाल कांद्यावर लक्ष केंद्रित केले असले तरी फारच कमी शेतकरी या कांदा उत्पादनात यशस्वी होत आहेत. त्यात रामेश्वर (ता. देवळा) येथील कुशल ढेपले या शेतकऱ्याने सर्वच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लाल कांदा पिकविला व सोमवारी देवळा बाजार समिती आवारात विक्रीसाठी आणला.

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

शेतकऱ्यांनी गर्दी

नवीन लाल कांदा पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. या हंगामात पहिल्यांदाच लाल कांदा आल्याने कांदामालक कुशल ढेपले या शेतकऱ्याचा बाजार समिती व व्यापाऱ्यांनी सत्कार करत अभिनंदन केले. बाजार समितीचे उपसभापती रमेश मेतकर, संचालक बापू देवरे, काकाजी शिंदे, सचिव माणिक निकम व इतर व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red onion for sale in the deola market nashik marathi news