
नाशिक/ त्र्यंबकेश्वर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधामुळे त्र्यंबकनगरीत सर्वत्र शुकशुकाट आहे. गुरुवारी (ता. 19) एकादशीची वारी असली तरी निवृत्तिनाथांचे समाधी मंदिर दर्शनास बंद असल्याने वारी भरणार नाही, असे विश्वस्थ मंडळाने जाहीर केले आहे.
लग्नाच्या वऱ्हाडींनाही कोरोनाचा धसका
कुशावर्तावर स्नानासही मज्जाव असल्याने तेथे बॅरिकेडिंग लावले आहे. सर्वत्र प्रशासनाच्या सूचनांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरात गर्दी नसल्याने व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवणे पसंत केले आहे. लग्नाच्या वऱ्हाडींनीही कोरोनाचा धसका घेतल्याचे वातावरण आहे. अगदी मोजक्या लोकांनाच घेऊन कार्य केले जात आहे. पुरोहितांनी व्यवसाय बंद केले. त्र्यंबकेश्वर विविध धार्मिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे; परंतु कोरोनाच्या धसक्याने प्रशासनाच्या निर्णयानुसार बुधवार (ता. 18)पासून धार्मिक कार्य पुढील निर्णय येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना परत पाठविण्यात आले आहे. पूजेच्या बुकिंग बंद करण्यात आल्याचे पुरोहित संघातर्फे जाहीर करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.