लॉकडाऊनमुळे स्थायी समिती सभापतींचा निकालही लांबला.. आता "या' तारखेनंतरच निर्णय

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 27 मार्च 2020

11 मार्चला त्यानंतर सुनावणी होती; परंतु शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आयुक्त व विभागीय आयुक्तांच्या वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधारे न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात शिवसेनेचे म्हणणे ऐकून घेण्याची मागणी केल्यानंतर न्या. एस. जे. काथावाला यांनी 19 मार्चला सुनावणी घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने न्यायालयाने कामकाजावर मर्यादा आणल्या. त्यानंतर 26 मार्चला सुनावणीचे आदेश दिले होते. देशभरात लॉकडाउन घोषित केल्याने 14 एप्रिलनंतरच सभापतिपदाचा फैसला होईल. 

नाशिक :  स्थायी समिती सभापतिपदासाठीच्या निवडणुकीच्या बंद पाकिटातील निकालावर गुरुवारी (ता. 26) उच्च न्यायालयात सुनावणी होती; परंतु कोरोनामुळे न्यायालयाचे कामकाज बंद असल्याने सभापतींचा फैसलाही 14 एप्रिलनंतरच होणार आहे. 

देशभरात लॉकडाउन.. स्थायी समिती सभापतिपदाचा निर्णय १४ एप्रिलनंतरच

महापालिका सभागृहात भाजपचे संख्याबळ घटल्याने स्थायी समितीवरील तौलनिक संख्याबळही घटले आहे. त्यानुसार शिवसेनेने उच्च न्यायालयात दावा केला आहे. त्यावर पहिली सुनावणी 3 मार्चला झाल्यानंतर न्यायालयाने 6 मार्चला निवडणूक घेण्याचे आदेशित केले होते. सभापतिपदाच्या निवडणुकीचा निकाल बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार न्यायालयात अहवाल पोचला आहे.

हेही वाचा >PHOTOS : "बापरे! जर्मन नागरिकांचे नाशिकमध्ये काय काम?" नागरिकांमध्ये अचानक खळबळ

11 मार्चला त्यानंतर सुनावणी होती; परंतु शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आयुक्त व विभागीय आयुक्तांच्या वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधारे न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात शिवसेनेचे म्हणणे ऐकून घेण्याची मागणी केल्यानंतर न्या. एस. जे. काथावाला यांनी 19 मार्चला सुनावणी घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने न्यायालयाने कामकाजावर मर्यादा आणल्या. त्यानंतर 26 मार्चला सुनावणीचे आदेश दिले होते. देशभरात लॉकडाउन घोषित केल्याने 14 एप्रिलनंतरच सभापतिपदाचा फैसला होईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The results of the Standing Committee Chairman,s result after April 14 nashik marathi news