esakal | अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवतीची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

arrest.jpg

घटनास्थळापासून जवळील बांधकाम साईटवरील वॉचमनकडे तपास केला असता, त्यांने काळ्या रंगाच्या रिक्षात एक संशयित व महिला जोरजोरात भांडण करत होते. थोड्या वेळानंतर ती रिक्षा जोरात तेथून निघून गेल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने संशयिताच्या शोधासाठी तपास सुरू केला.

अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवतीची हत्या

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : दोन दिवसांपूर्वी मखमलाबाद रोडकडे जाणाऱ्या पवार मळा येथील कच्चा रस्त्यालगतच्या नाल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तपासात या महिलेचा खून एका रिक्षाचालकाने केल्याचे उघड झाले आहे. वाचा का केली त्या रिक्षाचालकाने त्या गर्भवतीची हत्या?

अशी आहे घटना

पोलिसांनी तपासाचे अनुषंगाने सहाय्यक निरीक्षक शिवाजी अहिरे, सदाशिव भडीकर, सुधीर पाटील, उपनिरीक्षक मयूर पवार यांचे पथके तयार करून तपास सुरू केला. घटनास्थळापासून जवळील बांधकाम साईटवरील वॉचमनकडे तपास केला असता, त्यांने काळ्या रंगाच्या रिक्षात एक संशयित व महिला जोरजोरात भांडण करत होते. थोड्या वेळानंतर ती रिक्षा जोरात तेथून निघून गेल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने संशयिताच्या शोधासाठी तपास सुरू केला. मृत पूजा आखाडे यांच्या घरी जाऊन तपास केला असता, मुलगा साई विनोद आखाडे (वय ४) याने आई पूजा सागर भास्करबरोबर रिक्षाने जात असल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी सागरचे घर गाठले. परंतु तो घरी मिळून आला नाही. रिक्षामालक मणियार यांनी रिक्षाचालकाचे नाव आदेश ऊर्फ सागर दिलीप भास्कर (रा. मोरे मळा, पंचवटी) असे सांगितले. सागरबाबत त्याच्या मोबाईलचे लोकेशनवरून तो कडोदा (जि. सुरत, गुजरात) येथे असल्याचे कळाले. त्यानुसार पथक रवाना झाले. परंतु सागर नाशिककडे आल्याचे समजले. दरम्यान, संशयित आदेश ऊर्फ सागर दिलीप भास्कर हा मखमलाबाद रोड येथे आल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले. 

हेही वाचा >  ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO

याच कारणास्तव खून केल्याची कबुली 

संशयित सागर व मृत पूजा यांची ओळख होती. पूजा आखाडे या नेहमी संशयित सागरच्या रिक्षातून प्रवास करत. संशयित सागरने तिच्याकडून ८० हजार रुपये उसनवार घेतले होते. त्या पैशांची मागणी ती वारंवार करू लागली होती. याच कारणास्तव खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलिस आयुक्त दीपक पांडे, उपाआयुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक निरीक्षक सदाशिव भडीकर, शिवाजी अहिरे, सुधीर पाटील, उपनिरीक्षक मयूर पवार, शेवरे, रहेरे, चव्हाण, गुंबाडे व राठोड यांनी केली.

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

go to top