esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

girl student molestation.jpg

सध्या बारावीचे पेपर सुरू आहेत. पेपरला जाणाऱ्या विद्यार्थिनींला रस्त्यात गाठून छेड काढण्याची घटना समोर आली आहे. रोडरोमिओकडून परीक्षेस जाणाऱ्या विद्यार्थिनींना गैरवर्तन केले गेले. पीडित विद्यार्थीनींना लज्जा उत्पन्न होईल असे हातवारे व हावभाव दाखवून त्यांचा विनयभंग केला गेला.

'टेन्शन नेमकं पेपरचं घेऊ की त्याचं?'...रोजचं त्यांची धास्ती...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (कसबे सुकेणे) ओणे, मौजे सुकेणे व कसबे सुकेणे येथील पेपरला जाणाऱ्या बारावीच्या विद्यार्थिनींना वाटेत अडवून रोडरोमिओ छेड काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परीक्षेस जाणाऱ्या मुली धास्तावल्या आहेत. पेपरचं टेन्शन तर बाजूलाच पण, या रोडरोमिओंचाच विद्यार्थिनींना अधिक त्रास होत आहे.

असा आहे प्रकार

सध्या बारावीचे पेपर सुरू आहेत. पेपरला जाणाऱ्या विद्यार्थिनींला रस्त्यात गाठून छेड काढण्याची घटना समोर आली आहे. रोडरोमिओकडून परीक्षेस जाणाऱ्या विद्यार्थिनींना गैरवर्तन केले गेले. पीडित विद्यार्थीनींना लज्जा उत्पन्न होईल असे हातवारे व हावभाव दाखवून त्यांचा विनयभंग केला गेला. पीडित विद्यार्थीनीला संशयित व्यक्तीकडून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मुलींनी सुरवातीला हा प्रकार शिक्षक व पालकांना सांगितला. त्यानंतर ओझर पोलिस ठाण्यात पत्र दिले. टवाळखोरांकडून आमचे संरक्षण करावे, असे पत्रात म्हटले आहे. मात्र, ओझर पोलिसांनी याबाबत अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. यामुळे टवाळखोरांनी विद्यार्थिनींना त्रास देणे सुरूच ठेवले आहे. 3 मार्चपासून दहावीचे पेपर सुरू होत आहेत. अशाच प्रकारचा रोड रोमिओने छेड काढून ते दहावीच्या विद्यार्थिनींना देखील त्रास देऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी परीक्षेच्या काळात ओणे, मौजे सुकेणे व कसबे सुकेणे ते भाऊसाहेबनगर दरम्यान गस्त घालावी व रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकांनी केली आहे. 

हेही वाचा > भयंकर! इमारतीच्या गेटवर नाव भलतेच..अन् आतमध्ये चालायचा "धक्कादायक' प्रकार..

टवाळखोरांची पालकाला मारहाण 

पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने व हिंमत वाढलेल्या काही टवाळखोरांनी ओणे येथील एका मुलीची छेड काढली. समजवायला गेलेल्या त्या मुलीच्या वडिलांनाही टवाळखोरांनी मारहाण केली. गंभीर स्वरूपाचा प्रकार घडूनही पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पोलिसांनी टवाळखोरांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे. 

हेही वाचा > सुनेला वाचविण्यासाठी 'ते' पुढे सरसावले!...तर मुलाने त्यांनाच

सध्या कसबे सुकेणे पंचक्रोशीत टवाळखोरांनी उच्छाद मांडला आहे. मुलींना छेडण्याचे प्रकार दुर्दैवी आहे. अगोदरच मुलींना परीक्षेच्या तणावातून जावे लागत आहे. त्यात टवाळखोरांकडून त्रास होत असेल, तर अशा प्रवृत्तींचा तत्काळ नायनाट करावा व मुलींना व त्यांच्या पालकांना दिलासा द्यावा. त्यादृष्टीने पोलिसांनी कारवाई करावी. 
-रामेश्‍वर काठे, पालक, कसबे सुकेणे  

हेही वाचा > ज्या आईच्या उदरातून जन्म घेतला, त्यावरच 'त्याने' घाव घातला...
 

go to top