Sakal Impact : अवैध बायोडिझेल साठाप्रकरणी अखेर गुन्हा दाखल; महसूल विभागाची कारवाई

bio diesel.jpg
bio diesel.jpg

नाशिक : (मालेगाव) शहरातील जाफरनगर भागातील गुदामात आढळलेल्या अवैध बायोडिझेल साठाप्रकरणी वाणिज्य परवाना नसताना अवैधरीत्या इंधन विक्री साठवणूक करून नागरिकांच्या जीविताला व मालमत्तेला धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याने व जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम कलमान्वये अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्या मोहंमद असद हाफीज अकील अहमद (रा. सरदारनगर) यांच्याविरुद्ध अखेर गुरुवारी (ता.३) पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

जाफरनगरला आढळला होता साठा 

पुरवठा निरीक्षक अशोक साबणे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. पुरवठा अधिकाऱ्यांचा अहवाल व चौकशीनंतर गुन्हा दाखल करू, असे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी 'सकाळ'ला सांगितले होते. २१ ऑगस्टला अपर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक व महसूल विभागाने छापा टाकून ही कारवाई केली होती. दोन आठवड्यांनंतर प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाला. यामुळे लवकरच व्हीआरएल लॉजिस्टिक लिमिटेड पंप व निफाड येथील पंपावरील छापा प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या कारवाईने अवैध व भेसळीचे बायोडिझेल विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ‘सकाळ’ने राज्यातील बायोडिझेल भेसळीच्या गोरखधंद्याबाबत सातत्याने मोहीम राबवली. जाफरनगर भागातील कारवाईत तीन लाख १६ हजार ८०० रुपये किमतीचे पाच हजार ७६० लिटर बायोडिझेल, साडेतीन लाखांचा ट्रक, ड्रम व अन्य साहित्य असा सुमारे सहा लाख ६६ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. 

महसूल विभागाची कारवाई

महसूल विभागाने जाफरनगर व व्हीआरएल पंपावर जप्त केलेल्या बायोडिझेलचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. बायोडिझेल नमुने सीलबंद करून मेरी (नाशिक) व संबंधित विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवालानंतर बायोडिझेलमधील भेसळ स्पष्ट होईल. राज्य व केंद्राने या गोरखधंद्याची दखल घेतली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांच्या आदेशानंतर महसूल व पुरवठा विभाग सतर्क झाला आहे.  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com