खुशखबर! लॉकडाऊनमध्ये 'या' कंपनीकडून चक्क १० हजार रूपयाची पगारवाढ.. केला ऐतिहासिक करार!

employyes.jpg
employyes.jpg

नाशिक / सातपूर : गेल्या २३ महिन्यांपासून बाॅश कंपनी व्यवस्थापन व युनियन मध्ये पगारवाढीच्या करारावरून वाद होता. सदरचा प्रश्न सुटत आसतांनाच ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीमुळे पगारवाढ तर सोडाच पण आनेक दिवस उत्पादन बंद करण्याची वेळ आली होती. पण कामगारांनी धीर न सोडता फेब्रुवारीमध्ये युनियनवर विश्वास व्यक्त ठेवला. सातपूर येथील बाॅश कंपनीमध्ये 10 हजार रूपये पगारवाढीच्या ऐतिहासिक करारावर आज (ता.३) व्यवस्थापक व युनियन पदाधिकारी दरम्यान करण्यात आला. ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी व कोरोना च्या पार्श्वभूमीवर औद्योगिक चक्र बंद झाले असताना भविष्याचा विचार करून नाशिकमध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संचालक मंडळाच्या आश्वासनामुळे हा करार झाल्याचे युनियनचे अध्यक्ष अरूण भालेराव व सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

कामगारांनी धीर न सोडता युनियनवर विश्वास ठेवला

दरम्यान गेल्या २३ महिन्यांपासून बाॅश कंपनी व्यवस्थापन व युनियन मध्ये पगारवाढीच्या करारावरून वाद होता. सदरचा प्रश्न सुटत आसतांनाच ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीमुळे पगारवाढ तर सोडाच पण आनेक दिवस उत्पादन बंद करण्याची वेळ आली होती. पण कामगारांनी धीर न सोडता फेब्रुवारीमध्ये युनियनवर विश्वास व्यक्त केला. कामगार उपायुक्त जी.जे.दाभाडे व सहाय्यक कामगार आयुक्त विकास माळी, सहाय्यक  कामगार आयुक्त एस.टी.शिर्के यांनी उभय पक्षाची वेळोवेळी बैठक घेऊन दोन महिन्यात व्यवस्थापनाबरोबरचे सकारात्मक वातावरण तयार झाले. पण त्यात कोरोनामुळे सर्वत्र अंधाकारमयाचे दाट धुके पसरत असताना राखेतुन आशेचा किरण घेऊन उंच भरारी घेण्याची किमया जशी फिनिक्स पक्षाची असते तशीच बाॅशच्या स्मार्ट व्यवस्थापनाने करून दाखवले अस म्हटले तर वावगे ठरू नये.

पदाधिकारीनी करारावर सह्या केल्या.

युनियन व व्यवस्थापनाने गेले चार दिवसापासून मॅरेथॉन बैठका घेवून करारावर आज (ता.३) कंपनीचे नाशिक प्रकल्पाचे हेड अनंत रमन.एच.आर, व्यवस्थापक श्रीकांत चव्हाण, वरिष्ठ व्यवस्थापक मुकुंद भट, सतिश कुमार, जतिन सुळे, तमाल शेन. शरद गिते, देवन हल्ली तर युनियन तर्फे अध्यक्ष अरूण भालेराव, जनरल सेक्रेटरी श्रीकृष्ण कुलकर्णी, नितीन बिडवई, भाऊसाहेब बोराडे, हरिचंद्र नाठे, विनायक येवले, खजिनदार नंदलाल अहीरे, आदीसह इतर पदाधिकारीनी करारावर सह्या केल्या.

230 ट्रेनी कामगारांना कायम करण्याचा निर्णय

या करारामध्ये 7 हजार पाचशे रुपये पगारवाढ तसेच उत्पादनावर दोन हजार पाचशे अशी एकूण 10 हजार रूपयाची पगारवाढ झाली असून या बदल्यात युनियन तर्फे 7 % उत्पादन वाढवून देण्याच मान्य केल्याचे युनियनतर्फे सांगण्यात आले तसेच तसेच न्यु इंटर टेंपररी 230 कामगारांना कायम करण्याचा निर्णय ही घेण्यात आला. त्यात पहिल्या टप्प्यात 130 व नंतरच्या सहा महिन्यात 100 कामगार कायम होणार आहे हे या कराराचे वैशिष्ट्ये आहे. हा करार हा चार वर्षासाठी रहणार असून 1 जानेवारी 2017 पासून सर्व कायम कामगार, मयत झालेले कामगार, हजेरी पटावरील कामगार, व्हीआरएस घेतलेले कामगार या सर्वाना या पगारवाढीचा एरियस म्हणून साधारन प्रतेकी सव्वा तीन लाख रूपये एरियस मिळणार आहे.तसेच ओजीटी व इतर कामगाराचे पगार वाढीचा निर्णय ही पुढील काळात करण्यात येणार आहे.

औद्योगिक वसाहतीची चाके अधिक गतीमान होण्याचा मार्ग मोकळा

सध्या कंपनीत बाराशे कायम कामगार व 930 ट्रेनी कामगार सह सुमारे पाचशे व्यवस्थापनाचे कर्मचारी तसेच विविध सर्विसेसचे हजाराच्या वर ठेकेदार कामगार आहेत. भविष्याचा विचार करून युनियनने तडजोडी करत हा ऐतिहासिक करार केला असून यामुळे औद्योगिक क्षेत्रात नवसंजीवनी मिळणार आहे. यामुळे कामगार वर्गाबरोबर या कंपनीवर अवलंबून असलेल्या सुमारे शेकडो वेन्डर व त्यामध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांचे पुढील चार वर्षे तरी भविष्य चांगले राहणार आसल्याने औद्योगिक वसाहतीची चाके अधिक गतीमान होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना औद्योगिक क्षेत्रातुन व्यक्त होत आहे.

भविष्यातील गुंतवणूकीचा मार्ग मोकळा

ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीमुळे नाशिकच्या प्रकल्पाचे भवितव्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.त्यात कोरोना आला आणि नाशिकच्या प्रकल्पाबाबत मात्र भविष्यातील गुंतवणूकीचा मार्ग मोकळा झाला. असं या प्रकल्पात काम करणारे आजी माजी वरिष्ठ आधिकारी खाजगीत सांगतात. चीनमधील बाॅशच्या प्रकल्पातील भविष्यातील गुंतवणूक न करता ती गुंतवणूक नाशिकमध्ये करण्याचा सुतावास या कराराच्या निमीत्ताने संचालक मंडळाने दिल्याचे समजते यामुळे नाशिक प्रकल्पाचे भवितव्य अधिक उज्वल होईल असा विश्वास व्यवस्थापनाबरोबर कामगारांनीही व्यक्त केला आहे.

नवरा बायको दोन्ही परमानंट
गेल्या आनेक वर्षांपासून संदीप शिंदे व त्यांची पत्नी संगिता शिंदे हे दोन्ही ट्रेनी म्हणून काम करतात आज च्या पगारवाढी बरोबर 230 ट्रेनी कामगार कायम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे संगीता व संदीप शिंदे या नवरा बायको परमान्ट होणार आहेत ही बातमी फोनवरून युनियनचे पदाधिकारी श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी देताच शिंदे कुटूंबाचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे पाहायला मिळाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com