esakal | "कॉंग्रेसवर आरोप सूर्यावर थुंकण्यासारखे" - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut 1.jpg

गांधी घराण्याच्या त्यागाच्या आसपास आज एकही कुटुंब जाऊ शकत नाही. करीमलाला संदर्भात मी केलेले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेतले गेले. त्या काळी अंडरवर्ल्डच्या माध्यमातून समांतर सरकार चालविले जायचे. परंतु त्या वेळच्या माफियागिरीतही नीतिमत्तेचे बंधन पाळले जायचे. सामाजिक व राजकीय परिस्थितीचे भान ठेवले जायचे. मुसाफीरखान्यात मदतीसाठी गेलेल्या हेलनला करीमलालाने मदत केली, ती याच नीतिमत्तेतून हेच मला सांगायचे होते, असे राऊत म्हणाले. 

"कॉंग्रेसवर आरोप सूर्यावर थुंकण्यासारखे" - संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आम्ही महान आहोत हे दाखविण्यासाठी भाजपचा आटापिटा सुरू आहे. त्यातून गांधी, नेहरू कुटुंबावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. कॉंग्रेसने देशाला दिशा दिली आहे. कॉंग्रेस म्हणजेच चळवळ असून, त्यांच्यावर आरोप म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये (ता.२५) केले.

त्या काळी अंडरवर्ल्डच्या माध्यमातून सरकार चालविले जायचे

गांधी घराण्याच्या त्यागाच्या आसपास आज एकही कुटुंब जाऊ शकत नाही. करीमलाला संदर्भात मी केलेले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेतले गेले. त्या काळी अंडरवर्ल्डच्या माध्यमातून समांतर सरकार चालविले जायचे. परंतु त्या वेळच्या माफियागिरीतही नीतिमत्तेचे बंधन पाळले जायचे. सामाजिक व राजकीय परिस्थितीचे भान ठेवले जायचे. मुसाफीरखान्यात मदतीसाठी गेलेल्या हेलनला करीमलालाने मदत केली, ती याच नीतिमत्तेतून हेच मला सांगायचे होते, असे राऊत म्हणाले. 

VIDEO : "माझे हि फोन टॅपिंग व्हायचे"  छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट!​

दिल्लीसमोर झुकणार नाही 
कोरेगाव भीमा दंगलीचा तपास केंद्र सरकारने हाती घेतल्याचे कृत्य भितीतून झाले आहे. केंद्र सरकार राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करू शकते हे दाखविण्याचादेखील हा भाग आहे; परंतु महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही, हे दाखविण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा > अमित ठाकरे यांचे खरे 'लॉंचिंग' नाशिकमध्येच!