अमित ठाकरे यांचे खरे 'लॉंचिंग' नाशिकमध्येच!

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 25 January 2020

2012 ते 2017 दरम्यान महापालिकेत मनसेची सत्ता होती. सत्तेची पहिल्या वर्षाच्या कार्यकाळात राज ठाकरे नाशिकमध्ये फिरकले नाही. परंतु त्यानंतर दर सहा महिन्यांनी शहरात येऊन कामांचा आढावा घेतला. सोबत येताना त्यांनी काही खासगी कंपन्यादेखील आणून सामाजिक दायित्वातून प्रकल्प राबविले. शेवटच्या दोन वर्षांच्या टप्प्यात सहा ते सात वेळा राज यांनी नाशिकचा दौरा केला. त्या वेळी पुत्र अमित ठाकरे त्यांच्यासोबत असायचे.

नाशिक : राज्यातील सत्तांतरानिमित्त झालेल्या राजकीय बदलांच्या पार्श्‍वभूमीवर मनसेने पक्षाच्या ध्वजाचा रंग बदलतानाच अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड केली. मात्र अमित यांचे खरे लॉंचिंग नाशिकमध्येच झाले आहे. महापालिकेतील सत्ता असताना राज ठाकरे कायम नाशिकमध्ये यायचे. त्यांच्यासोबत अमितही उपस्थित राहून राजकारणातील बारकावे समजावून घेत असल्याने त्याचवेळी त्यांचा राजकारणाचा प्रवेश निश्‍चित झाला होता. त्या वेळी राज ठाकरे यांनी अमित यांना राजकारणात आणायचे नसल्याचे माध्यमांना स्पष्ट केले होते. 

महापालिकेतील सत्तेदरम्यान राज यांच्यासोबत घेतले बाळकडू 

2012 ते 2017 दरम्यान महापालिकेत मनसेची सत्ता होती. सत्तेची पहिल्या वर्षाच्या कार्यकाळात राज ठाकरे नाशिकमध्ये फिरकले नाही. परंतु त्यानंतर दर सहा महिन्यांनी शहरात येऊन कामांचा आढावा घेतला. सोबत येताना त्यांनी काही खासगी कंपन्यादेखील आणून सामाजिक दायित्वातून प्रकल्प राबविले. शेवटच्या दोन वर्षांच्या टप्प्यात सहा ते सात वेळा राज यांनी नाशिकचा दौरा केला. त्या वेळी पुत्र अमित ठाकरे त्यांच्यासोबत असायचे. त्याचवेळी अमित यांचा राजकारणाचा प्रवेश निश्‍चित झाला होता.

तो संपूर्ण दौरा अमित यांनी हाताळला होता...

अनेकदा अमित यांनी नाशिकचा स्वतंत्ररित्या दौरा करून पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होत्या. मुंबई, ठाणे येथील सिनेकलाकारांना नाशिकमधील प्रकल्प दाखविण्यासाठी सहलीचे नियोजन केले होते. तो संपूर्ण दौरा अमित यांनी हाताळला होता. त्या वेळी अमित यांच्या राजकारण प्रवेशाला नकार देण्यात आला असला, तरी 23 जानेवारीच्या मनसे अधिवेशनात अमित यांची नेतेपदी घोषणा करण्यात आली. 

हेही वाचा >  माझा काय दोष..मी का "नकोशी"? लुकलुकत्या डोळ्याने 'तिने' जणू विचारले...

मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये नाशिकला संधी 
महाविकास आघाडी सरकारच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातील शॅडो कॅबिनेटचा प्रयोग मनसेकडून केला जाणार आहे. त्यासाठी जुन्याजाणत्या नेत्यांची निवड केली जाईल. मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये नाशिकमधील कोण, याबाबत उत्सुकता लागली असून, प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रदीप पवार व माजी महापौर अशोक मुर्तडक यांना संधी मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मनसेचा मुख्य आधार शहरी मतदार आहेत. नाशिकमध्ये तर पाच वर्षे महापालिकेची सत्ता गाजविली, तर 2009 च्या निवडणुकीत शहरातून तीन आमदार निवडून आले होते. त्या मुळे नाशिकवर विशेष लक्ष असलेल्या राज यांच्या मनसे शॅडो कॅबिनेटमध्ये नाशिकचा समावेश होईलच, अशी अपेक्षा मनसैनिकांकडून व्यक्त होत आहे.  

VIDEO : "गणित शिकवायला हीच शिक्षिका हवी." ट्रिक बघून व्हाल हैराण! व्हिडिओ तुफान व्हायरल..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Thackeray,s launching in Nashik political Marathi News