२४ ऑगस्टच्या सुनावणीपूवीच प्रशासक नियुक्त्यामुळे सरपंच नाराजच; वाचा सविस्तर

विनोद बेदरकर
Saturday, 15 August 2020

सरपंच सेवा महासंघाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात येत्या २४ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असतानाच, शासनाने मुदत संपलेल्या व मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहेत. त्यामुळे सरपंचात नाराजी आहे.

नाशिक : सरपंच सेवा महासंघाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात येत्या २४ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असतानाच, शासनाने मुदत संपलेल्या व मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहेत. त्यामुळे सरपंचात नाराजी आहे. जिल्ह्यात ४९३  तर नाशिक तालुक्यातील ऑगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या २५ ग्रामपंचायतींवर १२ प्रशासक नेमले आहेत. 

मुदत संपलेल्या ठिकाणी प्रशासक

‘कोरोना’मुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.  एप्रिल ते  जूनदरम्यान मुदत संपलेल्या १०२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणूक झाली आहे. तर जुलैत ३७, ऑगस्टमध्ये ४५९, सप्टेंबरमध्ये दोन, ऑक्टोबरमध्ये दहा, नोव्हेंबरमध्ये एक, डिसेंबरमध्ये दहा, अशा एकूण ५१९ ग्रामपंचायतींची मुदत संपलेल्या ठिकाणी प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे अधिकार शासनाने संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत.

अखेर प्रशासकीय सरपंच मिळाले

पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने योग्य व्यक्तीची म्हणजे गावपुढाऱ्याची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरु असतांनाच, पुन्हा न्यायालयाने अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिल्याने विस्ताराधिकारी व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्यभर होत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या नियुक्त्या मुदत संपूनही रेंगाळल्याने अडचण काय, असा प्रश्‍न सुरू असताना  स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आदेश काढल्याने ग्रामपंचायतींना अखेर प्रशासकीय सरपंच मिळाले आहेत

शेवटी शासन थांबून राहिले आणि अधिकाऱ्यांना पुढे केले; पण लढाई मात्र न्यायालयात अधिकाऱ्यांबरोबर होईल. कारण विस्ताराधिकारी प्रशासकपदी नियुक्ती करावी असे कुठेच सांगितले नाही, मग या नेमणुका कशा होत आहेत, याचे सर्व पुरावे न्यायालयात सदर करण्यात येतील. - संतोष जुंद्रे, विद्यमान सरपंच, लोहशिंगवे, ग्रामपंचायत

PHOTOS : देश स्वातंत्र्य झाला.. पण आम्ही पारतंत्र्यातच? स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व दिनीच विहिरीत खाटेवर बसून आंदोलन

मुंगसरे, मातोरी (कृषी अधिकारी विजय चौधरी), तिरडशेत, विल्होळी (सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद मेढे), लहवित, नानेगाव (विस्ताराधिकारी जगन्नाथ सोनवणे), लोहशिंगवे, वंजारवाडी (विस्ताराधिकारी दादा आहिरे), दोनवाडे, बेलतगव्हाण (विस्ताराधिकारी मच्छिंद्र लिंबाजी कांगणे), मोहगाव, हिंगणवेढे (विस्ताराधिकारी भाऊसाहेब जगताप), सिद्ध पिंप्री, शिलापूर (विस्ताराधिकारी राजेंद्र शिरोडे), विंचूरगवळी, माडसांगवी, लाखलगाव (विस्ताराधिकारी श्रीधर सानप), पळसे, चांदगिरी (विस्ताराधिकारी सतीश पगार), शिंदे (विस्ताराधिकारी प्रकाश वैष्णव), जाखोरी, कालवी (कृषी अधिकारी संतोष राठोड), आंबेबहुला, रायगडनगर (विस्ताराधिकारी श्रीमती वंदना सोनवणे). 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

 

संपादन - विनोद बेदरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch upset over appointment of administrator before hearing nashik marathi news