नियतीचा क्रूर डाव! शाळेला सुट्टया म्हणून तलावाकडे गेलेल्या चिमुरड्याची आली अशी बातमी..कुटुंबियांचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 20 April 2020

लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने ओम आपल्या मूळगावी डोंगराळे येथे आई-वडिलांकडे राहण्यासाठी गेला होता. शनिवारी दुपारी तो गावाजवळील तलावावर बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला. त्याच्यासमवेत नववीत शिकणारा मोठा भाऊ होता. तलावाजवळ जाताच पाणी पाहून बैलांनी पाण्याकडे धाव घेतली. आणि काही क्षणातच...

नाशिक / मालेगाव : लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने ओम आपल्या मूळगावी डोंगराळे येथे आई-वडिलांकडे राहण्यासाठी गेला होता. शनिवारी दुपारी तो गावाजवळील तलावावर बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला. त्याच्यासमवेत नववीत शिकणारा मोठा भाऊ होता. तलावाजवळ जाताच पाणी पाहून बैलांनी पाण्याकडे धाव घेतली. आणि काही क्षणातच...

अशी घडली घटना...

डोंगराळे (ता. मालेगाव) तलावात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या सातवीतील विद्यार्थी ओम दिलीप अहिरे (वय 13) याचा बुडून मृत्यू झाला. हा प्रकार शनिवारी ( ता. 18) दुपारी घडला. ओम येथील केबीएच विद्यालयात शिकत होता. लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने ओम आपल्या मूळगावी डोंगराळे येथे आई-वडिलांकडे राहण्यासाठी गेला होता. शनिवारी दुपारी तो गावाजवळील तलावावर बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला. त्याच्यासमवेत नववीत शिकणारा मोठा भाऊ होता. तलावाजवळ जाताच पाणी पाहून बैलांनी पाण्याकडे धाव घेतली. काही क्षणातच ओम बैलांसोबत खोल पाण्यात ओढला गेला व तलावातील पाण्यात बुडाल्याने त्यांचा अंत झाला. अतिशय गरीब कुटुंबातील ओम शिक्षणासाठी शहराजवळील द्याने येथे कुटुंबासोबत राहत होता. लॉकडाउन असल्याने डोंगराळे या आपल्या मूळगावी गेला अन्‌ जीव गमावून बसला.

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?

ओमच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ

विशेष म्हणजे, अहिरे कुटुंबीयांनी गावावरील शेतीकामे करण्यासाठी नातेवाइकांची बैलजोडी मागून आणली होती. आठ दिवसांत शेत नांगरणी करून ते नातेवाइकांची बैलजोडी परत पाठविणार होते. ओमच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. 

हेही वाचा > GOOD NEWS : कोरोनापासून बचाव करणाऱ्या 'सुरक्षाकवच'ची होतेय नाशिकमध्ये निर्मिती...पाहा हा व्हिडिओ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School student died after drowning in pond nashik marathi news