
नाशिक : (येवला) पिकांना सध्या रासायनिक खतांची आवश्यकता असताना खते मिळेनासे झाले आहे. लिंकिंग पद्धतीने रासायनिक खते वितरीत करण्यात येत असल्याने मागेल त्याला खते मिळत नाहीत. तालुक्यात मागणीनुसार खते उपलब्ध करून द्या,रासायनिक खतांचा काळा बाजार थांबवा, मुख्यविक्रेत्यांच्या गोदामांची तपासणी करा. तसेच बनावट खते जप्त करुन योग्य कारवाई करावी अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
रासायनिक खतांच्या टंचाईमुळे शेतकरी चिंतेत
तालुक्यात खतांचा तुटवडा जाणवत असतांना दुकानांमधून व विविध शेतकरी संघाकडून खते गायब झाले आहेत. खते मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या पिकांची वाढ होण्यासाठी नत्र खतांची गरज असल्याने शेतकरी खत कुठे मिळेल, याची शोधाशोध करत फिरत आहेत. मात्र शेतकऱ्यांला वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुबलक प्रमाणावर खत केव्हा उपलब्ध होईल, अशा चिंतेत शेतकरी राजा सापडला आहे. या सर्व घडामोडींत जादा दराने खत विक्री करण्याचे प्रकारही घडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आत्मा योजनेत बांधावर बियाणे व खते पुरविणारी शासकीय यंत्रणा तालुक्यात जोमाने कार्यरत असल्याचा दावा कृषि विभागाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात शेतकरी वर्गास खते मिळत नाहीत. याकडे प्रहार संघटनेने लक्ष वेधले आहे. मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.
शेतकऱ्यांना खते उपलब्ध न झाल्यास आंदोलन
प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, गणेश लोहकरे, साहेबराव बारहाते, खंडू अहिरे, श्रावण चौघुले, देविदास धाकतोडी आदींनी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, दमदार व सातत्याने येणाऱ्या पावसामुळे सध्या खरीप पिकांची स्थिती चांगली असून ठिकठिकाणी कोळपणी झाल्याने पिकांना रासायनिक नत्र युरिया खतांची मात्रा देणे गरजेचे आहे. मात्र नेमक्या याच कालावधीतच तालुक्यात रासायनिक खतांची टंचाई जाणवू लागली आहे. यामागे कृत्रिम टंचाईची शक्यता असल्याने प्रशासनाने गोदामांची तपासणी करावी अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यार येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
(संपादन - किशोरी वाघ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.