ज्‍येष्ठ तबलावादक व निवृत्त शिक्षक नवीन तांबट यांचे निधन

अरुण मलाणी
Friday, 4 December 2020

ज्‍येष्ठ तबला वादक, आणि पेठे हायस्‍कूलचे निवृत्त शिक्षक नवीन तांबट (वय ७०) यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्‍यांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदर्शनात आले होते. त्‍यानंतर त्‍यांच्‍यावर उपचार सुरू असतांना प्रकृती खालावल्‍याने खासगी रूग्‍णालयात दाखल केले होते.

नाशिक : ज्‍येष्ठ तबला वादक, आणि पेठे हायस्‍कूलचे निवृत्त शिक्षक नवीन तांबट (वय ७०) यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्‍यांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदर्शनात आले होते. त्‍यानंतर त्‍यांच्‍यावर उपचार सुरू असतांना प्रकृती खालावल्‍याने खासगी रूग्‍णालयात दाखल केले होते. त्‍यातच उपचारादरम्‍यान शुक्रवारी (ता.४) सकाळी आठच्‍या सुमारास त्‍यांची प्राणज्‍योत मालावली. 

शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्‍या नवीन तांबट यांनी अनेक दिग्गज कलावंतांना साथ संगत केली होती. शिक्षण क्षेत्रातही आपले योगदान देतांना ते पेठे विद्यालयातून क्राफ्ट टीचर म्हणून निवृत्त झाले होते. नाशिक एज्युकेशन सोसाटीच्या पालक-शिक्षक संघाचे ते सदस्य होते. माजी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्‍हणून त्‍यांची ओळख होती. त्‍यांच्‍या निधनाच्‍या बातमीने संगीत, शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा तांबट, मुलगा निनाद तांबट, सून, मुलगी आणि पुतणे असा परिवार आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior tabla player Naveen Tambat passes away nashik marathi news