धक्कादायक! कोरोनाबाधित दोन हजार पार.. शहरात कोरोनामुळे सात रुग्णांचा मृत्यु 

corona second patient.jpg
corona second patient.jpg

नाशिक : नाशिक शहरात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून, या विषाणूने शहरातील सात तर नांदगाव येथील एका कोरोनाबाधितांचा बळी घेतला आहे. यात तिघांच्या मृत्युनंतर त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सोमवारी (ता.15) पुन्हा जिल्ह्यात कोरोनाचे 77 रुग्ण वाढले असून, यात नाशिक शहरातील 65 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दोन हजार पार गेला असून, गेल्या 20 दिवसांमध्ये जिल्ह्यात एक हजार कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामुळे नाशिकसह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढ वेगाने होत असताना, मालेगावात मात्र रुग्णांचा वेग पूर्वीच्या तुलनेमध्ये घटला आहे. 

अवघ्या 20 दिवसात जिल्ह्यात हजार रुग्णांची भर 
नाशिक शहरात सोमवारी (ता.15) कोरोनामुळे मृतांच्या संख्येत आणखी सात रुग्णांची भर पडली आहे. यातील तिघांच्या मृत्युनंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. खोडेनगरमधील 80 वर्षांचा वयोवृद्ध, सातपूरच्या महादेव वाडीतील 60 वर्षांचा वयोवृद्ध, भद्रकालीतील खडकाळी येथील 60 वर्षांचा वयोवृद्ध आणि वडाळागावातील 65 वर्षांचा वयोवृद्ध या चौघांना कोरोनाची लागण झालेली असताना, उपचारादरम्यान त्यांचा रविवारी (ता. 14) रात्री महापालिकेच्या रुग्णालयात मृत्यु झाला आहे. तर, नाशिकच्या पारिजातनगरमधील 60 वर्षीय पुरुष व जुन्या नाशिकमधील नाईकवाडी पुऱ्यातील 52 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे सोमवारी (ता. 15) महापालिकेच्या रुग्णालयात मृत्यु झाला आहे. या सात मृत्युमुळे शहरातील कोरोनामुळे मृतांचा आकडा 39 झाला आहे. जिल्ह्यातील आठवा कोरोना बळी तर जिल्ह्यातील नांदगाव शहरातील संभाजी चौकातील 58 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यु झाला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुळे मृतांचा आकडा 129 झाला आहे. तर, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2 हजार 62 झाला आहे. 

नाशिकमध्ये कहर; 65 पॉझिटिव्ह 
शहरात सोमवारी (ता.15) दिवसभरात 65 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात द्वारकेचा 31 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, लक्ष्मी निवास येथील 37 वर्षीय, टाकळी रोडच्या चक्रधर सोसायटीचा 26वर्षीय तरुण तर, अशोकामार्ग येथील 49 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आहे. जुन्या नाशिकमध्ये 20 वर्षीय तरुण, 13 वर्षांचा मुलगा, 69 वर्षांचा वयोवृद्ध, 57 वर्षांची महिला, 54 वर्षीय कोकणीपुऱ्यातील पुरुष, बागवान पुऱ्यातील 30 वर्षांचा तरुण, 54 वर्षांचा पुरुष, 35 वर्षांची महिला, 23 वर्षांची युवती आणि 15 दिवसांची मुलगी व 10 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. 44 वर्षीय महिला, फावडे लेनमधील 37 वर्षीय महिला, कापड बाजारातील 53 वर्षीय महिला, घास बाजारातील 52 वर्षीय पुरुष, वडाळ्यातील 60 वर्षीय पुरुष, 76 वर्षीय वयोवृद्ध तर, पखाल रोडवरील 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. सिडकोतील खुटवडनगरचा 42 वर्षीय पुरुष, सावतानगरमधील दोन महिला, पंचवटीतील रामनगरमध्ये 14 व 17 वर्षांचे दोघे, कोणार्कनगरमधील 37 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आहे. शहरातील पारिजातनगरमध्ये 60 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक, पेठरोड परिसरातील 30, 70, 43 व 58 वर्षांची महिला, 20 वर्षांचा तरुण, सारडा सर्कलचा 24 वर्षांचा तरुण, आडगाव नाका येथील 52 वर्षीय महिला, वडाळ्यातील 60 वर्षीय पुरुष, पखाल रोडवरील 41 वर्षीय पुरुष, रासबिहारी रोडवरील 61 वर्षीय पुरुष, म्हसरुळच्या शनिमंदिर परिसरातील 69 वर्षीय ज्येष्ठनागरिक, बागवानपुऱ्यातील 28 वर्षांची महिला, 40 वर्षांचा पुरुष, भक्तीनगरमधील 26 वर्षांची महिला, कथडातील 45 वर्षीय आणि फकीरवाडीतील 37 वर्षीय महिला, जुन्या नाशिकमधील 34 वर्षांचा एक पुरुष व एक महिला, 9 व 2 वर्षांची मुलगी आणि जोगवाड्यातील 37 वर्षीय पुरुषही पॉझिटिव्ह आहे. उपनगरचा 21 वर्षीय युवक, जेलरोडला 35 व 60 वर्षांची महिलेसह 3 वर्षांची मुलगी, जुन्या नाशिकच्या आझाद चौकातील 70 वर्षांची महिला, तपोवनातील 72 वर्षांची महिला, पंचवटीतील 23 वर्षांची युवती, हनुमानवाडीतील 49, 22 वर्षांच्या दोघी व 19 वर्षांचा युवक पॉझिटिव्ह आहे. तर, वडाळा रोडवरील 56 वर्षांची महिला, 31 वर्षांचा पुरुष व 25 वर्षांची महिला पॉझिटिव्ह आहेत. 

मालेगावात सात, उर्वरित जिल्ह्यात 5 रुग्ण 
मालेगावात आणखी सात जणांना बाधा झाली असून यात द्याने, मास्तरनगर, प्रथम निवास, पवारवाडी पोलिस स्टेशन, मालेगाव शहर, पांडुरंग नगर आणि विजयनगरमधील रुग्णांचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील सिन्नर तालुक्‍यातील दोडी येथे 28 वर्षीय तरुण, दिंडोरीच्या वणीतील 46 वर्षीय पुरुष तर, नांदगाव तालुक्‍यातील जातेगावचा 12 वर्षांचा मुलगा व तळवाड्यातील 20 वर्षांचा युवक पॉझिटिव्ह आहे. तसेच पिंपळगाव बसवंतचे 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकही कोरोनाबाधित आहेत. 

हेही वाचा > अंधश्रध्देचा खेळ आणि राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश..मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यासह १९ जण सामील

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचा तारखेनिहाय टप्पा : 
* 27 मार्च : पहिला रुग्ण 
* 21 एप्रिल : 100 
* 6 मे : 500 
* 26 मे : 1000 
* 6 जून : 1500 
* 15 जून : 2000 

हेही वाचा > भुजबळ संतापले...अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...नेमके काय घडले?

जिल्ह्याती कोरोनाची स्थिती : 
* कोरोनाबाधित रुग्ण : 2062 
* कोरोनामुक्त रुग्ण : 1305 
* कोरोना बळी : 129 
* आजमितीस उपचारार्थ रुग्ण : 628 
* प्रलंबित अहवाल : 458 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com