village quarantine.jpg
village quarantine.jpg

#COVID19 : जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त..अन् त्याचा परिणाम भोगताएत चक्क "इतकी' गावे!

नाशिक : रविवारी (ता.29) सायंकाळी लासलगाव येथे बेकरीत काम करणाऱ्या एकाचा अहवाल पॉझीटिव्ह आला. तोपर्यंत नाशिक जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. जिल्हा रुग्णालयाने यासंदर्भात तप्तरतेने कार्यवाही करुन त्याला आयसोलेट करीत उपचार सुरु केले. त्याच्या कुटुंबातील सात जणांची तपासणी केली. मात्र सबंध साथ रोग नियंत्रण पथक रात्रीच रवाना होऊन त्यांनी पहाटे साडे तीनला गावात उपाययोजना सुरु केली. संपूर्ण गावाला घरातच थांबण्याच्या सूचना देऊन त्याची कार्यवाही केली.

कोरोनाचा मुकाबला अन् गांभीर्य

नाशिक जिल्ह्यातील हा कोरोनाचा पहिला रुग्ण असून त्यानंतर सक्रीय झालेली यंत्रणा व आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ यातून राज्य शासन किती गांभीर्याने कोरोनाचा मुकाबला करीत आहे याची चुणुक दिसली. अहवाल मिळताच पहाटे साडे तीनलाच या गावात पोहोचलेल्या पथकाने सबंध गावाची तपासणी केली. परिसरातील सात गावे व आठ हजार जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले. त्यातून कोरोनाचा प्रभाव यंत्रणांचे कामातील गांभीर्य दोन्हीची जाणीव झाली.

घरोघरी प्रत्येकाची आरोग्य तपासणी
हा रुग्ण बेकरीत कामाला असल्याने त्याचा विक्रीच्या निमित्ताने परिसरातील अनेकांशी संबंध आला असावा, हे गृहित धरुन उपाययोजना केली. त्यात लासलगावजवळील पिंपळगाव नजीक गावात जिल्हा आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले असून, गावातील आठ हजार ग्रामस्थांना होम क्वारंटाइन केले आहे. घरोघरी जाऊन घरातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. शिवाय ज्या गावात कोरोनाबाधित युवक गेला होता त्या गावातही आरोग्य पथक दाखल झाले आहे.

सात गावे होम क्वारंटाइन
पिंपळगाव नजीक एक हजार 400 घरांचे आणि आठ हजार लोकवस्तीचे गाव आहे. मात्र, रविवारी रात्रीच हे गाव सील केले आहे. सोमवारी सकाळपासून आरोग्य पथकाने प्रत्येक घरी जाऊन ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी केली. कोरोनाबाधित युवक त्याच्या व्यवसायानिमित्त सात गावांमध्ये फिरला. त्या गावात आरोग्य पथक दाखल झाले आहेत. तसेच जे संबंधित युवकाच्या संपर्कात आले त्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. ही
 सातही गावे होम क्वारंटाइन करण्यात आली आहेत. या कार्यवाहीची एव्हढी चर्चा झाली की, एरव्ही कोरोना विषयी फारसे गंभीर नसलेल्यांनाही त्याचे पडसाद व परिणाम किती गभीर असु शकतात याची जाणीव झाली. या विषाणूंचा प्रसार गुणाकारत्मक स्तरावर वेगाने होते. त्यामुळे नागरीकांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केले.

सर्वत्र सतर्कता 

त्या युवकाच्या गावासह सात गावांमध्ये जाऊन तपासणी सुरू केली आहे. लक्षणे आढळली तर कोरोनाची चाचणी केली जाईल. सर्व सतर्कता घेतली जात आहे - डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्यधिकारी, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com