मालेगाव मनपाला सातवा वेतन आयोग लागू; आयोगाचा तेराशे जणांना लाभ 

प्रमोद सावंत
Thursday, 15 October 2020

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सातवा वेतन आयोग लागू झालेली राज्यातील ही पहिली ‘ड’ वर्ग महापालिका आहे.

मालेगाव(जि.नाशिक) : महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सातवा वेतन आयोग लागू झालेली राज्यातील ही पहिली ‘ड’ वर्ग महापालिका आहे.

आयोगाचा तेराशे जणांना लाभ

आयोग लागू होताच येथील अधिकारी कर्मचारी यांनी आनंदोत्सव साजरा केला. राज्यात यापूर्वी नवी मुंबई व पिंपरी-चिंचवड महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू आहे. आयोगाचा तेराशे जणांना लाभ होईल. आयोग लागू केल्याने आस्थापना खर्चात दरमहा सुमारे ७५ लाख रुपये वाढ होणार असल्याचे लेखापरीक्षक कमरूद्दीन शेख यांनी ‘सकाळ’ ला सांगितले. याबरोबरच टप्प्या टप्याने प्रलंबित फरकही अदा करावा लागेल. महासभेने यापूर्वीच सातवा वेतन आयोग लागू करण्याचा ठराव केला होता. ठराव मंजुरीसाठी शासनाला पाठविण्यात आला होता. मनपा प्रशासनातर्फे महापौर ताहेरा शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शासनातर्फे आज नाशिक व मालेगाव मनपाला याबाबतचे पत्र प्राप्त झाले. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventh Pay Commission applied to Malegaon Municipal Corporation nashik marathi news