कोरोना पार्श्‍वभूमीवर शरद पवारांचा शुक्रवारी नाशिक दौरा... होणार विविध घटकांशी चर्चा 

sharad pawar.jpg
sharad pawar.jpg

नाशिक : शहर व जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे येत्या शुक्रवारी नाशिकला येत आहेत. दुपारी दोनला त्याचे आगमन होईल. त्यानंतरचे नियोजन अद्याप निश्‍चित झालेले नाही. यापूर्वीच्या दौऱ्यात पवार यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेताना फक्त निवडक सूचना केल्या होत्या. त्यात कोरोना विषयक चाचण्यांची स्थिती, त्यात किती वाढ करावी, त्याची स्थिती, निष्कर्ष, मृत्यूदर कसी कमी करता येईल, त्यासाठी नेमकेपणाने काय करावे, नागरीकांना दिलासा मिळेल असे काय काय केले पाहिजे, यांसह प्रामुख्याने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यावर त्यांचा भर होता. पण आता त्यांच्या प्रत्यक्ष भेटीमुळे अनेकांना या दौऱ्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास त्यातून वाढेल. 

नाशिक शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वी पुणे, सोलापूरसह विविध भागात दौरा केला आहे. त्यांनी यावेळी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे त्यांचा दौरा काम करणाऱ्या सामाजिक संस्था, कार्यकर्ते, सेवाभावी कार्यकर्ते तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही त्यातून नेमकेपणाने काम करण्याची दिशा मिळाली आहे. राजकीयदृष्ट्या देखील हा दौरा चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी विविध घटकांशी चर्चा करतील. कोरोना कसा नियंत्रणात आणायचा, याविषयी नेमका कार्यक्रम तसेच दिशादर्शन यातून प्रशासनाला होईल. विशेषतः शरद पवार नाशिकला येणार असल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास त्यातून वाढेल. 

कोरोनाविषयक आढावा घेऊन ते सगळ्यांना मार्गदर्शन

मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा झाली आहे. कोरोनावरील उपाययोजनांबाबत शासन अतिशय गंभीरपणे काम करीत आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे शुक्रवारी नाशिकला येत आहेत. कोरोनाविषयक आढावा घेऊन ते सगळ्यांना मार्गदर्शन करतील. नाशिककर कोरोनाला निश्‍चित पराभूत करतील.- छगन भुजबळ, पालकमंत्री. 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com