रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

रात्री अकरा वाजेच्या सुमारास 19 वर्षीय युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याने तिला पंचवटी पोलिसांच्या गस्तीपथकाने ताब्यात घेतले. पंचवटी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर तात्काळ निर्भया पथकाला कळविण्यात आले. निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक संगीता गावित व त्यांच्या पथकाने धाव घेतली. तिच्याकडे विचारणा केली असता ती उडवाउडवी उत्तरे देत होती. त्यानंतर...

नाशिक : रात्री अकरा वाजेच्या सुमारास 19 वर्षीय युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याने तिला पंचवटी पोलिसांच्या गस्तीपथकाने ताब्यात घेतले. पंचवटी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर तात्काळ निर्भया पथकाला कळविण्यात आले. निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक संगीता गावित व त्यांच्या पथकाने धाव घेतली. तिच्याकडे विचारणा केली असता ती उडवाउडवी उत्तरे देत होती. त्यानंतर...

असा घडला प्रकार

गेल्या शनिवारी (ता. 13) रात्री अकरा वाजेच्या सुमारास 19 वर्षीय युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याने तिला पंचवटी पोलिसांच्या गस्तीपथकाने ताब्यात घेतले. पंचवटी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर तात्काळ निर्भया पथकाला कळविण्यात आले. निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक संगीता गावित व त्यांच्या पथकाने धाव घेतली. तिच्याकडे विचारणा केली असता ती उडवाउडवी उत्तरे देत होती. त्यामुळे महिला पोलिस हैराण झाले. अखेरिस तिला महिलांच्या वात्सल्य आधाराश्रमात रवाना करण्याचा निर्णय घेतला. तिची आरोग्य तपासणी करून तिला आधाराश्रमात नेले असता, त्यांनी घेण्यास नकार दिला. त्या मुलीची कोरोना चाचणी करण्यासाठी तपोवनात क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला.

मुलीने सांगितले हे कारण...

हे सारे पाहिल्यानंतर मात्र त्या मुलीला निर्भया पथकाने पुन्हा विचारणा केली असता, ती बोलू लागली. घरातील पाण्याचा नळ चालू राहिला म्हणून आईने रागावले. त्यामुळे 19 वर्षीय मुलीने न सांगता रागाच्या भरात घर सोडले. मात्र रात्रीच्यावेळी निर्भया पोलिस पथकाने तिला ताब्यात घेतल्यानंतर विश्‍वासात घेतल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. पथकाने तिचे समुपदेशन केल्यानंतर तिला तिच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आले.

निर्भया पथकाने समुपदेशन करून केले पालकांच्या स्वाधीन 

 अंबड परिसरातील तिच्या पालकांशी संपर्क साधला असता, ते अंबड पोलिस ठाण्यात मुलीची बेपत्ताची तक्रार देण्यासाठीच गेलेले होते. त्यांना तात्काळ पंचवटी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले. तर, मुलीने कुटूंबियांकडून मानसिक त्रास दिल्याने घरी जाण्यास नकार दिला. पथकाने तिचे समुपदेशन केले. तसेच, तिच्या पालकांनाही समज देण्यात आली. त्यानंतर तिने घरी जाण्यास मान्य केल्यानंतर तिला तिच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आले. यावेळी निर्भय पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता गावित, उपनिरीक्षक गायत्री जाधव, पोलीस हवालदार सुभाष पाडवी, रेखा धुळे यांनी ही कामगिरी बजावली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She left the house because her mother was angry