शिरवाडे वणी शिवारात कार उलटून तीन गंभीर; अपघातग्रस्त जिल्हा रुग्णालयात दाखल

दीपक अहिरे
Saturday, 9 January 2021

शिरवाडे वणी शिवारात एका हॉटेलसमोर पहाटे पावणेपाचच्या सुमारास मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला.

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणी शिवारात गुरुवारी (ता. ७) पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो सीटर (आरजे ०९, यूए ९२६१) उलटून अपघातात नऊपैकी तीन जण गंभीर, तर सहा जण किरकोळ जखमी झाले.

अपघातग्रस्त जिल्हा रुग्णालयात दाखल

शिरवाडे वणी शिवारात एका हॉटेलसमोर पहाटे पावणेपाचच्या सुमारास मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. अपघातग्रस्तांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shirwade Wani Shivara car overturned three serious nashik marathi news