कोरोना रुग्णांसाठी शिवसेना एक्शन मोड मध्ये..! आक्रमक भूमिका

सकाळ वृ्त्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना त्याचा फायदा घेत शहरातील कॉर्पोरेट हॉस्पिटलकडून दरासंदर्भातील शासनाचे निकष डावलून लाखो रुपये उकळले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेना ऍक्‍शन मोडमध्ये आली आहे.

नाशिक : कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक पिळवणुकीच्या तक्रारींचा वाढता ओघ लक्षात घेता मैदानात उतरलेल्या शिवसेनेने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून रुग्णांच्या नातेवाइकांना आणखी एक पाठिंब्याचा सुखद धक्का दिला आहे.

शिवसेना ऍक्‍शन मोडमध्ये

शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना त्याचा फायदा घेत शहरातील कॉर्पोरेट हॉस्पिटलकडून दरासंदर्भातील शासनाचे निकष डावलून लाखो रुपये उकळले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेना ऍक्‍शन मोडमध्ये आली आहे. कोरोनामुक्तीसाठी व गरिबांना सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध व्हावे म्हणून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. परंतु या रुग्णालयांमध्ये मनमानी पद्धतीने शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारून आर्थिक पिळवणूक केली जात आहे. यातून रुग्णांचे नातेवाईक कर्जबाजारी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी काही नागरिकांच्या लेखी तक्रारींच्या अनुषंगाने शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली असून, आता हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. आर्थिक पिळवणूक झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी बिलांसह शिवसेनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी शनिवारी (ता. 27) केले. 

...अशी आहे हेल्पलाइन 
खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांना बिलासंदर्भात तक्रार असल्यास आवश्‍यक कागदपत्रे व बिलासह 9021986967, तसेच 9372422800 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर आवश्‍यक कागदपत्रांसह तक्रार करावी. तक्रार फक्त व्हॉट्‌सऍपद्वारेच स्वीकारली जाणार आहे. 

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..​

तक्रारीसाठी पुढे यावे
रुग्णालयांच्या बिलांमुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांनी व्हॉट्‌सऍप क्रमांकावर तक्रार करावी. तक्रारीची शहानिशा करून आवश्‍यकता भासल्यास तक्रारदारास समक्ष बोलावून पुढील कार्यवाही केली जाईल. नागरिकांनी कोणाच्याही दडपणाला बळी न पडता तक्रारीसाठी पुढे यावे. -अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते 

हेही वाचा > डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena action mode for corona patients nashik marathi news