शिवसेनेकडून "स्थायी'साठी अतिरिक्त जागेची मागणी 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

2017 मध्ये महापालिका निवडणुकीत भाजपचे 66 सदस्य निवडून आले होते. त्यामुळे नगरसेवक संख्येच्या गुणोत्तर प्रमाण 8.33 असल्याने त्यानुसार भाजपचे स्थायी समितीवर नऊ सदस्य नियुक्त झाले. बहुमत असल्याने स्थायी समितीची सत्तादेखील सलग तीन वर्षे भाजपच्या ताब्यात राहिली. सध्या भाजपचे संख्याबळ घटले आहे.

नाशिक : महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचे संख्याबळ घटल्याने स्थायी समितीतील एक जागा कमी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शिवसेनेने अतिरिक्त एक जागा वाढविण्याची तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्‍तांकडे दावा केला आहे. 28 फेब्रुवारीला स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होत असून, त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

सिडकोतील जागा शिवसेनेने कायम राखली

2017 मध्ये महापालिका निवडणुकीत भाजपचे 66 सदस्य निवडून आले होते. त्यामुळे नगरसेवक संख्येच्या गुणोत्तर प्रमाण 8.33 असल्याने त्यानुसार भाजपचे स्थायी समितीवर नऊ सदस्य नियुक्त झाले. बहुमत असल्याने स्थायी समितीची सत्तादेखील सलग तीन वर्षे भाजपच्या ताब्यात राहिली. सध्या भाजपचे संख्याबळ घटले आहे. सरोज अहिरे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा नगरसेवक निवडून आला. सिडकोतील जागा शिवसेनेने कायम राखली. त्याचदरम्यान पंचवटी विभागातील नगरसेविका शांता हिरे यांचे निधन झाल्याने आणखी एक जागा रिक्त झाली. आता भाजपच्या नगरसेवकांची संख्या लक्षात घेता गुणोत्तर प्रमाण 8.46 इतके झाले आहे. त्यामुळे आठ सदस्य थेट नियुक्त होतील.

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

अधिक गुणोत्तर असल्याने मागणी

दुसरीकडे शिवसेनेचे 34 नगरसेवकांचे गुणोत्तर प्रमाण 4.53 असल्याने चार सदस्य नियुक्त होतील. तर भाजपचे 0.46 पेक्षा शिवसेनेचे 0.53 अधिक गुणोत्तर असल्याने त्याआधारे शिवसेनेने अतिरिक्त एका जागेची मागणी केली आहे.  

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena demands for additional space For standing committee Nashik Marathi News