येवल्यात आत्महत्येचा थरार! भर बाजारपेठेत युवकाने संपवली जीवनयात्रा 

संतोष विंचू
Saturday, 10 October 2020

वेगळ्यावेगळ्या कारणांनी अनेक प्रकारच्या आत्महत्या आपण नेहमीच पाहतो. मात्र, शुक्रवारी येथील भर बाजारपेठेतील रस्त्यावर एका युवकाने ऐन दुपारी केलेली थरारक आत्महत्या भीती अन्‌ कुतुहलाचा विषय ठरली.

येवला(जि.नाशिक)  : वेगळ्यावेगळ्या कारणांनी अनेक प्रकारच्या आत्महत्या आपण नेहमीच पाहतो. मात्र, शुक्रवारी (ता. ९) येथील भर बाजारपेठेतील रस्त्यावर एका युवकाने ऐन दुपारी केलेली थरारक आत्महत्या भीती अन्‌ कुतुहलाचा विषय ठरली. या युवकाने स्वतःच्या पोटावर, गुप्तांगावर अन्‌ गळ्यावर वार करून घेत केलेली आत्महत्या अंगावर शहारा आणणारी आहे. 

अंगावर शहारा आणणारी घटना; काय घडले नेमके?
येथील बाजारपेठेत दुपारच्या वेळी नागरिकांची नेहमीप्रमाणेच गर्दी होती. जो-तो आपापल्या व्यवहारात मग्न असतानाच अचानक एका तरुणाचे हे कृत्य सर्वांना अचंबित करणारे ठरले. मेन रोडवरील पेटी शॉप व्यापारी संकुलासमोर बुंदेलपुरा येथील राहणारा मुकेश अनिलसिंग परदेशी (वय २५) या युवकाने कोंबडी कापण्याच्या सुऱ्याने स्वतःच्या गुप्त भागावर, पोटावर, तसेच मानेवर वार करून घेत आत्महत्या केली. वार केल्यानंतर तो खाली रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार पाहून अनेकांची पळापळ झाली. अनेकांच्या हा प्रकार लक्षात न आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा > आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना 

आत्महत्येमुळे शहरात घबराट

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे आदींसह पोलिस तत्काळ घटनास्थळी पोचले. या जखमी तरुणाला समाजसेवकांच्या मदतीने तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. या आगळ्यावेगळ्या आत्महत्येमुळे शहरात घबराट निर्माण झाली असून, आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. पोलिस हवालदार आर. एन. पाटील तपास करत आहेत.  

हेही वाचा > आठशे सीसीटीव्हीतून शहर नजरेच्या एकाच टप्प्यात! कमांड कंट्रोल सेंटर सज्ज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shocking Suicides in Yeola's market nashik marathi news