आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

आता नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर कमी होणार असून, अवघ्या अडीच तासाच नाशिककरांना मुंबईत पोहचणे शक्य होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. यामुळे उद्योग व्यवसायाला देखील मोठी चालना मिळणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे.

नाशिक : आता नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर कमी होणार असून, अवघ्या अडीच तासाच नाशिककरांना मुंबईत पोहचणे शक्य होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. यामुळे उद्योग व्यवसायाला देखील मोठी चालना मिळणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे.

दोन्ही महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर कमी

समृद्धी महामार्ग व मुंबई महामार्ग या दोन्ही महामार्गांना हा पूल जोडला जाणार आहे. दोन्ही महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर कमी होणार असून, अवघ्या अडीच तासाच नाशिककरांना मुंबईत पोहचणे शक्य होणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे. तसेच वडपे ते गोंदे या दरम्यानच्या महामार्ग देखील सहा पदरी करणाचा प्रस्तावही लवकरच मंजूर होणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश

वाढत्या अपघातांना आळा बसावा, नाशिक-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी व्हावा, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी समृद्धी महामार्ग आणि नाशिक-मुंबई महामार्ग क्र. ३ यांच्यात उड्डाणपुलाद्वारे जोडणी व्हावी यासाठी खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ४८ कोटी रुपयांच्या खर्चाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंप्री फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना

या उड्डाण पुलाची लांबी सुमारे ७८ मीटर असून हा उड्डाणपूल सहा पदरी आहे. गोंदेपर्यंत महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या प्रस्ताव ही आता लवकरच मार्गी लागणार आहे. यामुळे नाशिक-मुंबई हा प्रवास आता अडीच तासांवर येणार असून, उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: journey from Nashik to Mumbai is only two and a half hours nashik marathi news