सिन्नरच्या औद्योगिक क्षेत्राला मोठ्या उद्योगांची प्रतीक्षा! शासनाने लक्ष देण्याची उद्योजकांची मागणी 

sinner jamin.jpg
sinner jamin.jpg

सिन्नर (जि.नाशिक) : संपूर्ण देशात कोरोनामुळे उद्योगविश्व हादरून गेले आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल केले जात राज्यातील उद्योग अडखळतच सुरू आहेत. कारण मोठ्या उद्योगांना लागणाऱ्या सुविधा अजूनही तोकड्या असल्याने लघुउद्योजकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मोठ्या उद्योगांची प्रतीक्षा

नाशिकच्या सातपूरसह परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतील जमिनी उद्योगांसाठी शिल्लक नाहीत. सिन्नरच्या औद्योगिक क्षेत्रात जमिनी सहजपणे उपलब्ध आहेत. मात्र येथे मोठे उद्योग येण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने सिन्नर तालुक्यातील औद्यगिक क्षेत्राला अद्यापही मोठ्या उद्योगांची प्रतीक्षा आहे. सिन्नरला मोठे उद्योग आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी आता जोर धरत आहे. 

सणाच्या तोंडावर बाजारात उलाढाल
सिन्नरला सध्या उद्योगजगत हळूहळू उभारी घेऊ लागले आहे. माळेगाव वसाहतीतील ८० टक्के कंपन्या सुरू झाल्या आहेत. मात्र काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. सणाच्या तोंडावर बाजारात उलाढाल वाढल्याने अनेक लघुउद्योजकांचे काम वाढले आहे. अजूनही कोरोनामुळे अनेक ठिकाणचे मार्केट पूर्णपणे सुरू झालेले नाही. राज्यातील औद्यगिक बाजारपेठत सध्या रेलचेल वाढली असली तरी उद्योजकांना आणखी सुविधा देणे आवश्यक आहे. 

एक हजार ६०० एकर जागा तशीच पडून
यातच जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात मोठे उद्योग आलो पाहिजेत. जेणेकरून स्थानिक लघुउद्योजकांना याचा फायदा मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. नाशिकला जरी जागा उपलब्ध नसेल तरी सिन्नरला मात्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. इंडियाबुल्ससाठी अधिग्रहित केलेली एक हजार ६०० एकर जागा तशीच पडून आहे. तसेच त्या जागांच्या बदल्यात गुळवंचच्या शेतकऱ्यांना दिलेल्या कमर्शियल जमिनीही तशाच पडून आहेत. 
सिन्नरच्या औद्यागिक क्षेत्राला चालना देण्यासाठी याठिकाणी शासनाच्या उद्योग विभागाने लक्ष दिल्यास आणखी एक औद्योगिक वसाहत उभी राहू शकेल. जर असे शक्य झाले, तर आणि शासनाने उद्योजकांना वेळेत व एक खिडकी योजनेत संधी दिल्यास सिन्नरला मोठे उद्योग येतील. यामुळे सिन्नर व नाशिक दोन्ही मिळून औद्योगिक हब बनण्यास वेळ लागणार नाही. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

३५० एकर जमिनीचे अधिग्रहण 
मापारवाडी (ता. सिन्नर) परिसरात औद्योगिक महामंडळाने नुकतीच ३५० एकर जमीन अधिग्रहित केली आहे. त्या जमिनीवर लेआउट तयार करण्याचे काम सुुरू आहे. मापारवाडी येथीलही भूसंपादनाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. सध्या माळेगाव वसाहतीत एक हजार २०० पैकी ८०० कंपन्या सुरू आहेत, तर मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहतीत ३७० उद्योग सुरू आहेत. 
 

उद्योग क्षेत्रात येणाऱ्या नव्या दमाच्या तरुण उद्योजकांना शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी शासनाने स्वतंत्र संस्था निर्माण करून नव्याने येणाऱ्यांसाठी प्रोत्साहन, प्रशिक्षण किंवा कार्यशाळा घेतली पाहिजे, तरच राज्यात उद्योग वाढीस लागेल. - सुधीर बडगुजर, अतिरिक्त उपाध्यक्ष, निमा, सिन्नर 

विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एसईझेड) साठी अधिग्रहित केलेली इंडियाबुल्सजवळची १०० एकर जमीन अनेक वर्षांपासून तशीच पडून आहे. सध्या ‘स्टाइस’कडे लघुउद्योगांसाठी जमिनीची मागणी आहे; पण ती शिल्लक नसल्याने अडचणी येते आहेत. शासनाने ‘एसईझेड’ची जमीन ‘स्टाइस’ला दिली किंवा भाडेतत्त्वावर दिली, तरी तेथे आणखी एक औद्योगिक वसाहत उभी राहू शकते. - अविनाश तांबे, संचालक स्टाइस, सिन्नर 

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com