
नाशिक : अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान तयार करण्यात आलेल्या १.१ किलोमीटर लांबीच्या स्मार्ट रस्त्याची रायडिंग क्वॉलिटी सुधारण्यासाठी पवई आयआयटी संस्थेचा सल्ला घेण्यासाठी आणखी तीन कोटी रुपये देण्याचा स्मार्टसिटी कंपनीचा प्रस्ताव चुकीचा असून, यापूर्वीच्या सल्ल्यापोटी देण्यात आलेली रक्कम स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी केली.
त्याच्याकडून दंड वसूल करण्याची मागणी
स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गरज नसताना अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका रस्ता तयार केला. वास्तविक, रस्ता तयार करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत होती. पावणेतीन वर्षे उलटली तरी अद्यापही काम पूर्ण नाही. २१ कोटींच्या वर रस्त्यासाठी खर्च झाला. नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याची ढिसाळ गुणवत्ता असल्याचे सिद्ध झाले. रायडिंग क्वॉलिटी चांगली नसल्याचे स्मार्टसिटी कंपनीने पवई आयआयटीचा प्रस्ताव सादर करून कबुली दिली. रस्त्याची रायडिंग क्वॉलिटी खराब होण्यास ठेकेदार जबाबदार आहे. असे असताना नागरिकांचा कररूपी निधी रायडिंग क्वॉलिटी सुधारण्यासाठी पुन्हा खर्च करण्याचा प्रस्ताव सादर करणे गंभीर बाब असल्याचे श्री. पाटील यांनी म्हटले आहे. स्मार्ट रस्त्याची रायडिंग क्वॉलिटी खराब होण्यास ठेकेदार जबाबदार असल्याने त्याच्याकडूनच दंड वसूल करण्याची मागणी करण्यात आली.
प्रकल्प खर्च वाढविण्याचे षडयंत्र
स्मार्टसिटीअंतर्गत रस्ते, वीज, ड्रेनेजच्या कामासाठी एकत्रित निविदा साधारण एक ते दीड वर्षांपूर्वी प्रसिद्ध करून कार्यारंभ आदेश देण्यात आले. परंतु अद्यापही दहा टक्के काम झाले नसून कामे प्रलंबित ठेवून प्रकल्पाचा खर्च वाढविण्याचे षडयंत्र स्मार्टसिटी कंपनीचे अधिकारी व ठेकेदारांचे असल्याचा आरोप करण्यात आला. राजवाडा, पाथरवट गल्ली, सेवाकुंज परिसरात स्मार्टसिटीअंतर्गत रस्ते, वीज, गटार करण्यासाठी पत्र देऊनही काम सुरू करण्यात आले नसल्याची पुस्ती श्री. पाटील यांनी जोडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.