esakal | पशुखाद्याच्या ट्रकमधून लपविले 'घबाड'; पोलिसांकडून प्रकरणाचा धक्कादायक खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon illigal liquor.jpg

​मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहेरे फाट्यानजीक पशुखाद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी ट्रकला अडवताच धक्कादायक खुलासा झाला. 

पशुखाद्याच्या ट्रकमधून लपविले 'घबाड'; पोलिसांकडून प्रकरणाचा धक्कादायक खुलासा

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव / नाशिक : ​मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहेरे फाट्यानजीक पशुखाद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी ट्रकला अडवताच धक्कादायक खुलासा झाला. 

पशुखाद्याच्या ट्रकमधून अवैधरीत्या वाहतूक

पशुखाद्याच्या ट्रकमधून अवैधरीत्या लाखोंचा मद्यसाठाची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचारी पंकज भोये व भूषण खैरनार यांनी टेहेरे फाट्याजवळ गुरुवारी (ता. १९) रात्री नऊच्या सुमारास मालवाहू ट्रक (एमएच ४३, वाय २६८७) अडवून त्याची तपासणी केली. त्या वेळी पोलिसांना ट्रकमध्ये पशुखाद्याच्या आड देशी-विदेशी मद्याचे ४९८ बॉक्स मिळून आले. पोलिसांनी आयबी, सिग्नेचर, १०० पायपर, किंगफिशर बिअर व देशी-विदेशी दारूचा अवैध मद्यसाठा, जनावरांचे पशुखाद्य, रोख रक्कम, मोबाईल व ट्रक असा एकूण ३८ लाख ६६३ रुपयांचा ऐवज जप्त केला. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

मद्यसाठा हा कोठून कोठे जात होता?

पोलिसांनी ट्रकचालक सलीम इरफान अली (वय २३, गाजियाबाद, उत्तर प्रदेश) यास अटक केली. पोलिसांनी त्याकडे चौकशी केली असता, अतुल मदन नामक व्यक्ती या मद्यसाठ्याचा मालक असल्याचे त्याने सांगितले. 
संबंधित ट्रक ही खारघर येथील विनोद राव यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली आहे. मद्यसाठा घेऊन जाण्यासाठी मदत करणाऱ्या सचिन बाबूराव नेतावटे (रा. पंचवटी, नाशिक) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. छावणी पोलिस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सलीम इरफान व सचिन नेतावटे यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. संबंधत मद्यसाठा हा कोठून कोठे जात होता या संदर्भात पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिस तपास करीत आहेत.  

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

३८ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त

मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहेरे फाट्यानजीक पशुखाद्याची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडत त्यातून ३८ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.