
नाशिक/येवला : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार जिल्हा परिषद शाळांच्या गुरुजींकडून विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन मोफत पाठ्यपुस्तके वाटप सुरू आहेत. येवला तालुक्यातील सुमारे तीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचणार आहेत. मात्र गुरुजी हे काम करतानाच इयत्तानिहाय वर्गांतील पटसंख्या टिकविण्यासाठी झटणारे शिक्षक शाळेत नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी वेगळ्या प्रकारची फिल्डिंगही लावत आहेत. यामुळे खरंच शाळा प्रवेश कायम राहण्यासह वाढीसही मदत होईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तब्बल 46 विषयांची पुस्तके
येवला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीचे वर्ग असून मराठी माध्यमाचे सुमारे 28 हजार 472 तर उर्दू माध्यमाचे 1 हजार 761 विद्यार्थी आहेत. या 30 हजार 223 विद्यार्थ्यांसाठी सुमारे एक लाख 75 हजार पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. यामध्ये तब्बल वेगवेगळ्या 46 विषयांची पुस्तके उपलब्ध असून त्यांचे वितरण सुरू आहे. तालुक्यामध्ये स्वतः पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड देखील घरपोच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटपात सहभागी होत आहेत. शिक्षण विभागाकडून पुस्तक पोहोचवण्याचे काम शिक्षण विभागाचे पूर्ण होत आले आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नवीन शाळेचे प्रवेशासाठी नाव नोंदवण्याचे काम प्रत्येक गावात सुरू आहे. यासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन करतानाच घरात कोणी शाळा प्रवेशासाठी पात्र मुलं-मुली आहेत का याचीही विचारणा होत आहे. यामुळे आपोआपच गुरूजींना पुस्तक वाटपातून नवीन विद्यार्थी मिळण्यास मदत होत आहे.
पट वाढवण्याची मोठी संधी
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पट वाढवण्याची खूप मोठी संधी यानिमित्ताने उपलब्ध झालेली आहे. जिल्हा परिषदेच्यासुद्धा शाळा नवीन नवीन शालेय उपक्रम राबवून शाळेमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांपासून ते सर्व अभ्यासक्रम शिकवण्याचे काम हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व पुस्तके मिळाली पाहिजे, यासाठी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक प्रयत्नशील आहेत. प्रत्येक केंद्रातल्या दोन शाळांना भेटी देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तकं मिळाली किंवा नाही याची पडताळणी स्वतः सभापती गायकवाड करत आहेत.
नवा वर्ग, नवे पुस्तक..!
दरम्यान नव्या वर्गातील नवे पुस्तक हातात पडलेले विद्यार्थी या पुस्तकाचा आनंद घेत आहेत. शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांनी या पुस्तकातून अभ्यास करण्याच्या सूचनाही शिक्षक वाटपादरम्यान करत आहेत. मात्र शाळा सुरू होईपर्यंत घरी असलेले विद्यार्थी पुस्तकाची काळजी कितपत घेतात हाही प्रश्नच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.