"मालेगावची ही पत्थे आत्मसात केली ..तर कोरोना दूर पळालाच म्हणून समजा..!"

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 22 July 2020

वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मालेगावात समन्वयक म्हणून यशस्वी काम केलेले, लाचलुचपत विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांनी मंगळवारी मनमाड शहराला भेट दिली. डॉक्टर्स, राजकीय पक्ष, पत्रकार व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कडासने व त्यांच्यासोबत मालेगावहून आलेल्या डॉक्टरांनी मनमाड शहरातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी मालेगावला कोरोना विषयी यश कसे मिळाले याबद्दल सांगितले...ते म्हणाले...​

नाशिक / मनमाड : मनमाडमध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मालेगावात समन्वयक म्हणून यशस्वी काम केलेले, लाचलुचपत विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांनी मंगळवारी मनमाड शहराला भेट दिली. डॉक्टर्स, राजकीय पक्ष, पत्रकार व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कडासने व त्यांच्यासोबत मालेगावहून आलेल्या डॉक्टरांनी मनमाड शहरातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी मालेगावला कोरोना विषयी यश कसे मिळाले याबद्दल सांगितले...ते म्हणाले...

मालेगावात यश येण्यामागे नागरिकांची भूमिकाच महत्त्वाची

 यावेळी कडासने म्हणाले, डायबिटीस, शुगर, दमा, अस्थमा आदी आजार असलेल्यांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. प्रचार, प्रसार आणि कायद्याचे पालन होणं महत्त्वाचं आहे. मालेगावात अनेक ठिकाणी प्रशासन न पोचल्याने समन्वय साधला गेला नाही. मालेगावात वापरलेली पॉलिसी आत्मसात केल्यास कोरोना वाढणे शक्य नाही. मालेगावात यश येण्यामागे मालेगावातील नागरिकांची भूमिकाच महत्त्वाची आहे. डॉक्टरांचे तर यश आहेच. कोरोनाने कोणीही मरत नाही, वेळेवर औषधे घ्या कोरोना बरा होतो. 

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!

मालेगाव डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन मनमाडकरांसाठी लाभदायक
मनमाड शहरात कोरोना रुग्णाची संख्या १६१ वर पोचल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून, या पार्श्वभूमीवर आज समन्वयक कडासने व मालेगाव डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन मनमाडकरांसाठी लाभदायक ठरणार आहे.

`कोरोना` विषयी मनात भीती ठेऊ नका.

`कोरोना` विषयी मनात भीती ठेऊ नका. त्याएैवजी त्याला धीराने सामोरे जा. मात्र हे करतांना पुरेशी पत्थ्ये पाळा. सकारात्मक विचार करा आणि मालेगावकरांनी जी पत्थ्ये अंगीकारली, त्याचा अवलंब केला तर कोरोना होऊच शकत नाही, कोरोनाला हरविण्यासाठी कोरोना विषयी ज्ञान आणि काळजी घेण्याची गरज आहे. शहरातील डॉक्टरांनी मोहल्ला क्लिनिक सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे  मालेगावात समन्वयक म्हणून यशस्वी काम केलेले, लाचलुचपत विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांनी केले.  

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

 

(संपादन - ज्योती देवरे)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suggestion for follow precoutions malegaon never be covid patient nashik marathi news