esakal | VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse

कोरोनाविरूद्धच्‍या लढ्यात ऊर्जा वाढविण्यासाठीचे मालेगावच्‍या शैलीतील अनोखे नृत्‍य सध्या सर्वत्र व्‍हायरल होत आहे. अशातच खुद्द राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे चक्क कोरोनाबाधितांमध्ये शिरले अन् कमालच केली...असे काय केले कृषिमंत्र्यांनी सर्वत्र कौतुक होतयं..एकदा तुम्हीच पाहा ना..!

VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

sakal_logo
By
प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : कोरोनाविरूद्धच्‍या लढ्यात ऊर्जा वाढविण्यासाठीचे मालेगावच्‍या शैलीतील अनोखे नृत्‍य सध्या सर्वत्र व्‍हायरल होत आहे. अशातच खुद्द राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे चक्क कोरोनाबाधितांमध्ये शिरले अन् कमालच केली...असे काय केले कृषिमंत्र्यांनी सर्वत्र कौतुक होतयं..एकदा तुम्हीच पाहा ना..!

तीन पावलीवर कृषिमंत्र्यांचा ठेका

मालेगावच्या मसगा महाविद्यालयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी चक्‍क कृषीमंत्री दादा भुसे उपस्‍थित झाले. त्‍यातच कृषीमंत्री दादा भुसे यांनीही कोरोना बाधितांसोबत सोशल डिस्‍टंसिंगचे पालन करत योगा केला. अन्‌ त्‍यानंतर लोकप्रिय अशा तीन पावलीवर ठेका धरत रूग्‍णांचे मनोबल वाढविले. असे हे ऊर्जावर्धक दृष्य व्‍हिडीओत कैद झाले असून, हा व्‍हिडीओ चांगलाच व्‍हायरल होत आहे.

रुग्णांमध्ये उत्‍साह बघण्यासारखाच!

कृषीमंत्री दादा भुसे यांनी रूग्‍णांसोबत केलेला योगा अन्‌ तीन पावली नृत्य शहर व परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. तीन दिवसांसाठी मालेगाव दौर्यावर आलेल्‍या  भुसे यांनी रविवारी (ता. १९) सायंकाळी मसगा महाविद्यालयाला भेट दिली. उपमहापौर नीलेश आहेर, प्रभाग सभापती राजाराम जाधव, डॉ. जतीन कापडणीस आदींसह मसगा कोविड केअर सेंटर येथे भुसे उपस्‍थित झाले. या ठिकाणी डॉ. उज्ज्वल कापडणीस व सहकारी अनेक दिवसांपासून योगा घेत आहेत. नेमके त्याचवेळी भेट दिल्याने भुसे यांनीही रुग्णांसमवेत योगा केला. त्यानंतर रुग्णांनी उत्साहाने प्रसिद्ध तीन पावली नृत्य सुरु केले. त्यातही कृषीमंत्र्यांनी सहभाग संगीताच्‍या तालावर ठेका धरला. थेट कृषीमंत्री दादा भुसे आपल्‍यासोबत नृत्‍य करत असल्‍याने उपस्‍थित रूग्‍णांमध्ये अधिकच उत्‍साह संचारला होता.

रिपोर्टर - प्रमोद सावंत
(संपादन - अरुण मलाणी / 
edited by - ज्योती देवरे)