esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल पांडुरंग आहि.jpg

चिराई येथील शिवारात रविवारी (ता. 21) कर्जबाजारीपणाला कंटाळून पहाटेच्या सुमारास एका शेतक-याने शेतातील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. डोक्यावर असलेले डोंगराएवढं कर्ज फेडायचं कसं? या काळजीतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. 

धक्कादायक! डोक्यावरचं कर्ज फेडायचं कसं?...जीवाची होत होती घुसमट...अन् घेतला अखेरचा निर्णय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : अंबासन (बागलाण) तालुक्यातील चिराई येथील शिवारात रविवारी (ता. 21) कर्जबाजारीपणाला कंटाळून पहाटेच्या सुमारास एका शेतक-याने शेतातील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. डोक्यावर असलेले डोंगराएवढं कर्ज फेडायचं कसं? या काळजीतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. 

अशी आहे घटना

चिराई शिवारातील अल्पभूधारक शेतकरी अनिल पांडुरंग आहिरे (वय ४७) यांच्या नावे अडीच एकर जमीन आहे. शेतीसाठी त्यांनी विविध सहकारी सोसायटीचे दोन लाख, बॅक ऑफ महाराष्ट्र टेंभे येथील (बॅकेला सुट्टी असल्याने कर्जाचा अकडा समजू शकला नाही), वित्तीय महामंडळ महींद्रा रूरल हौसिंग फायनान्स लि. वरळी मुंबई शाखा दीड लाखांचा बोजा सातबा-यावर दर्शविला आहे. कर्जाचा डोंगर वाढतच असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी अनिल आहिरे अस्वस्थ झाले होते असे कुटुंबियांनी सांगितले. रविवार (ता. २१) पहाटेच्या सुमारास कुटुंबियांना त्यांच्या बेडरूमचा दरवाजा उघडला असता त्यांनी छताला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. 

हेही वाचा > निर्दयीपणाचा कळस! तीन दिवसाचे बाळ टाकले शेतात...अन् मग..

कुटुंबियांचा आक्रोश

लागलीच कुटुंबियांनी टाहो फोडल्याने आजूबाजूला असलेल्या शेतक-यांनी धाव घेतली. मुलगा आत्महत्येची माहिती जायखेडा पोलिस ठाण्यात देण्यात आली. उपनिरीक्षक स्वप्निल कोळी, हवालदार जी. एल. महाजन, बापु फंगाळ, आर. डी. वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. महसूलचे मंडळ अधिकारी सी. पी. आहिरे, तलाठी अर्जुन अव्हाळे हेही दाखल होत पंचनामा केला व तातडीने वरिष्ठांना याबाबत अहवाल सादर केला. अनिल आहिरे यांचे नामपुर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले. 

हेही वाचा > MPSC RESULT : नाशिकच्या उमेदवारांचा "एमपीएससी'त विविध पदांवर डंका!

go to top