esakal | VIDEO : जेव्हा सुनीता ताईंकडून नकळत झाले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार...पाहा थरारक आपबिती..
sakal

बोलून बातमी शोधा

sunita patil.jpg

सुनीता पाटील यांनी लॉकडाउनच्या काळात दोन मृतदेहांना तूप लावून त्यांचे अंत्यसंस्कार केले. मात्र, नातेवाईक लांब का उभे आहेत, याबाबत त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी न डगमगता मृतदेहावर अंत्यसंस्कार करून दैनंदिन कामकाज सुरू केले. मात्र, दोन दिवसांनी मृत्यू दाखला आल्यानंतर दाखला पाहून सुनीताताईंना धडकी भरली.​ पाहा थरारक आपबिती...

VIDEO : जेव्हा सुनीता ताईंकडून नकळत झाले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार...पाहा थरारक आपबिती..

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : सुनीता पाटील यांनी लॉकडाउनच्या काळात दोन मृतदेहांना तूप लावून त्यांचे अंत्यसंस्कार केले. मात्र, नातेवाईक लांब का उभे आहेत, याबाबत त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी न डगमगता मृतदेहावर अंत्यसंस्कार करून दैनंदिन कामकाज सुरू केले. मात्र, दोन दिवसांनी मृत्यू दाखला आल्यानंतर दाखला पाहून सुनीताताईंना धडकी भरली.​ पाहा थरारक आपबिती...

सुनीताताईंनी नकळत केले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार
सतरा वर्षांपासून पंचवटीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणाऱ्या आणि सह्याद्री वाहिनीच्या हिरकणी पुरस्काराने सन्मानित सुनीता पाटील यांनी लॉकडाउनच्या काळात दोन मृतदेहांना तूप लावून त्यांचे अंत्यसंस्कार केले. मात्र, नातेवाईक लांब का उभे आहेत, याबाबत त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी न डगमगता मृतदेहावर अंत्यसंस्कार करून दैनंदिन कामकाज सुरू केले. मात्र, दोन दिवसांनी मृत्यू दाखला आल्यानंतर दाखला पाहून सुनीताताईंना धडकी भरली. मृत्यू दाखल्यावर कोरोनाचे कारण असल्याचे पाहून त्यांचे कुटुंबीय हादरले. आता पुढे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला

प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय मृत शरीराची सेवा करायची नाही

कुठल्याही दवाखान्यात न जाता कोरोनाची चाचणी न करता केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आत्मविश्वासाने नियमित कामकाज सुरू केले. आजपर्यंत काहीच झाले नाही आणि कशाचाच त्रास झाला नाही, असे त्या सांगतात. दोन मृत शरीरांपैकी एकाच्या घरातील आठही जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. हे कळाल्यावर सुनीताताईंचे नातेवाईक त्यांना घरी भेटायला आले. यापुढे प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय मृत शरीराची सेवा करायची नाही, असे कुटुंबीयांनी त्यांना सांगितले. सध्या त्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मृतदेहांचे विद्युत दाहिनीद्वारे अंत्यसंस्कार करत आहेत. आत्मविश्‍वास, चिकाटी आणि देवावर श्रद्धा असल्यामुळेच आपण न डगमगता जिवंत राहिलो आहे,असे त्या सांगतात.

हेही वाचा > ज्या मालेगावला भाजपच्या खासदारांनी नावे ठेवली.. फडणवीसांनी मात्र केले कौतुक..!

अन् त्यांच्या मनात धडकी भरली.

दोन व्यक्तिंच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्या व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले अन् त्यांच्या मनात धडकी भरली. मात्र, धोका पत्करून इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी या संकटातून सहीसलामत बाहेर पडून आपले काम कायम ठेवले. 

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!


मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईक लांबूनच पाहत होते. त्यांच्या हातात सॅनिटायझरने भरलेले स्प्रे होते. ते सारखे हाताला मारत होते. जेव्हा मृत्यूचा दाखला आला, त्या वेळी मृत कोरोनारुग्ण आहे हे ऐकून मला धडकी भरली. मात्र, देवावर विश्वास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मला काहीच झाले नाही.- सुनीता पाटील, पंचवटी, अमरधाम

रिपोर्टर - हर्षवर्धन बोऱ्हाडे

(संपादन - ज्योती देवरे)


 

go to top