गर्भपाताच्या गोळ्या देऊन प्रियकराने चक्क 'तिचा' गर्भपातही केला...त्यानंतर...

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 14 February 2020

2015-2018 यादरम्यान पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने तिच्या मोठ्या बहिणीला याबाबत सांगितले. तिने दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु संशयिताने पीडितेशी प्रेमसंबंध असून, तिच्याशी विवाह करणार असल्याचे सांगितले. संशयिताने गर्भपाताच्या गोळ्याही आणल्या होत्या..

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे शारीरिक संबंध प्रस्थापित करून दुसऱ्याच तरुणीशी विवाह करणाऱ्या संशयिताविरुद्ध बुधवारी (ता. 12) भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

असा घडला धक्कादायक प्रकार...

पीडितेच्या तक्रारीनुसार पीडित युवती आणि संशयित नवाज अस्लम जहागीरदार यांची 2014 मध्ये फेसबुकवर ओळख झाली. त्यांचे अनेक दिवस फेसबुकवर संभाषण सुरू होते. एके दिवशी त्याने पांडवलेणी, फाळके स्मारक येथे फिरवून एकमेकांची माहिती जाणून घेतली. संशयिताने 2015-2018 यादरम्यान पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने तिच्या मोठ्या बहिणीला याबाबत सांगितले. तिने दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु संशयिताने पीडितेशी प्रेमसंबंध असून, तिच्याशी विवाह करणार असल्याचे सांगितले. संशयिताने गर्भपाताच्या गोळ्या देऊन पीडितेचा गर्भपातही केला. एके दिवशी संशयिताच्या कुटुंबीयांनी दोघांना बरोबर पाहिल्यानंतर संशयिताने पीडितेशी सर्व संबंध तोडून तिला टाळण्यास सुरवात केली. त्याने प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा > अक्षरशः चक्काचूर! अखेर 'असा' झाला मैत्रीचा दुर्देैवी अंत..

काही दिवसांनी संपर्क झाला. त्याने तिला वडाळा रोड येथील ओळखीच्या व्यक्तीच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्या व्यक्तीने संशयित नवाजचा पिच्छा सोडून दे, असे म्हणत ठार करण्याची धमकी दिली. मंगळवारी (ता.11) पीडितेस संशयित एका महिलेसोबत शालिमार भागात दिसला. ती त्याची पत्नी असल्याचे सांगताच पीडितेचा व संशयिताच्या पत्नीचा वाद झाला. पीडितेने भद्रकाली पोलिस ठाणे गाठत संशयिताविरुद्ध बलात्कार आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. पोलिसानी संशयितास ताब्यात घेतले आहे. त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspect arrested who Rape on woman Nashik Crime Marathi News