अक्षरशः चक्काचूर! अखेर 'असा' झाला मैत्रीचा दुर्देैवी अंत..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

द्याने फाट्यापासून एक किलोमीटरवर नामपूरकडे भरधाव जाणाऱ्या इंडिगो कार (एमएच 04, ईएफ 2827)ने आसखेड्याकडे जाणाऱ्या दुचाकी (एमएच 04, जेजे 7464)ला जोरदार धडक दिली. यात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. ही दुचाकी दोन मित्र चालवत होते.

नाशिक : औरंगाबाद-अहवा महामार्गावरील द्याने फाट्यानजीक इंडिगो कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोराणे सांडस (ता. बागलाण) येथील दुचाकीवरील दोघे मित्र ठार झाले. ही घटना बुधवारी (ता.12) दुपारी दीडच्या सुमारास घडली. 

अशी घडली घटना....
द्याने फाट्यापासून एक किलोमीटरवर नामपूरकडे भरधाव जाणाऱ्या इंडिगो कार (एमएच 04, ईएफ 2827)ने आसखेड्याकडे जाणाऱ्या दुचाकी (एमएच 04, जेजे 7464)ला जोरदार धडक दिली. यात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. दुचाकीवरील गणेश मधुकर शेवाळे (वय 20) व गौरव भगवान कांदीलकर (21) दोघेही मित्र युवक गंभीर जखमी झाले. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून नामपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गणेश शेवाळे यास मृत घोषित केले. गौरव कांदीलकर याला मालेगावला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

हेही वाचा > नवविवाहितेला मुंबईत विकायचा डाव...नवरा अन् पहिल्या बायकोची काळी कृत्ये!

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

कारचालक फरारी झाला असून, या प्रकरणी जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मोराणेत दोन्ही तरुणांवर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two young men killed in Car-bike accident Nashik Marathi News